-->

30 जून पर्यंत गावे ओडिएफ प्लस करा:  प्रकल्प संचालक जगदीश साहू यांचे निर्देश.

30 जून पर्यंत गावे ओडिएफ प्लस करा: प्रकल्प संचालक जगदीश साहू यांचे निर्देश.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

30 जून पर्यंत गावे ओडिएफ प्लस करा:

प्रकल्प संचालक जगदीश साहू यांचे निर्देश.


येणाऱ्या 30 जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त् अधिक अर्थात ओडीएफ प्लस करण्याचे निर्देश जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहू यांनी केले आहे.

साहू यांनी जिल्ह्यातील सर्व समूह समन्वयक आणि तालुका समन्वयक, एमआरईजीएस चे एपीओ यांची दिनांक 20 रोजी सभा घेऊन उपरोक्त निर्देश दिले. ओडिएफ प्लस अर्थात हागणदारीमुक्त अधिकचे तीन प्रकारापैकी अस्पायरिंग या प्रथम प्रकारामध्ये जिल्ह्यातील सर्व गावे ओडिएफ प्लस करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. यामध्ये एमआरईजीएसचे एपीओ यांनी आपल्याशी संबंधीत कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही दिले.

 यावेळी साहू यांनी ओडिएफ  प्लस म्हणजे काय, ओडिएफ प्लस गावांचे निकष याबाबत सविस्तर माहिती दिली. 

 ओडिएफ प्लस म्हणजे काय?

हागणदारी मुक्तीचे मानांकन प्राप्त गावांमध्ये शौचालयाचे बांधकाम अथवा पुनर्प्रस्थापीकरण करणे, सामुदायिक शौचालयाचे संकुल उभारणे आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित इतर अनुषंगिक कामे पूर्ण करून शाश्वत रित्या स्वच्छता कायम ठेवणे म्हणजे गाव ओडीएफ प्लस अर्थात हागणदारीमुक्त अधिक करणे होय.

ओडिएफ प्लस चे तीन टप्पे: 

१. अस्पायरिंग : A गावातील सर्व कुटुंबाकडे कार्यरत शौचालय सुविधा असून त्याचा वापर सुरू आहे. B गावातील शाळा अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत कार्यालय येथे शौचालय सुविधा असून महिला व पुरुषांसाठी शौचालयाची स्वतंत्र सुविधा आहे. C गावात सांडपाणी व्यवस्थापन किंवा घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध आहेत.

2. रायझिंग: अस्पायरिंग मधील मुद्यांसह गावात घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या दोन्हींची सुविधा आहे.

3. मॉडेल: A अस्पायरिंग आणि रायझिंग यांच्या निकषासह गावात सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी कचरा आणि कमीत कमी सांडपाणी असून कुठेही प्लास्टिक कचरा आढळत नसावा. B गावात हागणदारीमुक्त अधिकचे दृश्यमान संदेश वाल पेंटिंगच्या माध्यमातून लावण्यात आलेले असावे.

-----------------------------------

बैठकीला जिल्हा कक्षाचे सल्लागार रविचंद्र पडघान, शंकर आंबेकर, विजय नागे, सुमेर चाणेकर, पुष्पलता अफुणे, अमित घुले, अभिजीत दुधाटे, प्रवीण पान्हेरकर, प्रदीप सावळकर, अभय तायडे आणि एमआरजीएस चे सहायक कार्यक्रम अधिकारी संदिप खिल्लारे यांची उपस्थिती होती.

----------------------------------

0 Response to "30 जून पर्यंत गावे ओडिएफ प्लस करा: प्रकल्प संचालक जगदीश साहू यांचे निर्देश."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article