जिल्ह्यात आशा स्वयंसेविकांची घरोघरी जाऊन जनजागृती.
साप्ताहिक सागर आदित्य
मतदान हे दान नसून आपल्यावर कोण राज्य करेल हे ठरवण्याचा अधिकार आहे,
हा अधिकार बजावा!
जिल्ह्यात आशा स्वयंसेविकांची घरोघरी जाऊन जनजागृती.
तब्बल ७१५०5 घरांवर लिहला संदेश..!
जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या वतीने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी भरीव प्रयत्न करण्यात येत असुन त्यांनी जिल्ह्यातील तब्बल 71 हजार 505 घरांच्या दरवाजावर मतदानाचा हक्क बजावण्याबाबत संदेश लिहला आहे.
सध्या जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक पार पडत असून लोकशाही मजबूत करण्याकरिता मतदानाची टक्केवारी वाढविणे अत्यंत आवश्यक असते. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या संकल्पनेतून आशा स्वयंसेविका यांनी मतदान जनजागृतीचा विडा उचलला आहे. गावातील प्रत्येक घरी जाऊन आशा स्वयंसेविका मतदान करण्यासाठी आवाहन करीत आहेत. या आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन मतदानाबाबत लोकांचे समुपदेशन करीत आहेत तसेच भेट दिलेल्या घरांच्या भिंतीवर अथवा दरवाजावर याबाबत संदेशही लिहीत आहेत. या संदेशामध्ये
"मतदान हे दान नसून आपल्यावर कोण राज्य करेल हे निवडण्याचा अधिकार आहे, तो अधिकार बजावा" असा मजकूर लिहिला जात आहे. या माध्यमातून आशा स्वयंसेविका गावकऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन करीत आहेत. त्यांच्या या राष्ट्रीय कामाचे कौतुक जि. प. चे सीईओ वैभव वाघमारे यांनी केले आहे.
भिंतीवर, दरवाजावर संदेश लिहिण्याबाबत तालुकानिहाय आकडेवारी.
- मंगरूळपीर - 15744
- रिसोड- 16353
- मालेगाव - 5027
- कारंजा - 10895
- मानोरा - 2050
- वाशिम - 21436
दि. 23 पर्यंत एकूण 71505 घरांच्या दरवाज्यावर मतदान जागृती पर मजकूर लिहण्यात आला आहे. जिल्ह्यातील आशा स्वयंसेवकांनी अवघ्या दोन दिवसात 71 हजाराच्या वर घरांना भेटी देऊन मतदानाबाबत घरांवर संदेश लिहिला असून यापुढेही हे काम युद्ध पातळीवर सुरू राहणार असल्याची माहिती आशा स्वयंसेविकेचे जिल्हा संघटक जगदीश पवार यांनी दिली.
0 Response to "जिल्ह्यात आशा स्वयंसेविकांची घरोघरी जाऊन जनजागृती."
Post a Comment