-->

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले.

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बालाजी हरण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत राठोड, बालरोग तज्ञ डॉ. सुनिता घुडे, जयश्री भालेराव, सहाय्यक अधिसेविका चव्हाण, अधिपरीचारीका संगेवार, पुनम खंडारे, राखी काळे, छाया धाबे, दिपाली तांगडे, अॅड. राधा नरवलीया, ओम राऊत यांच्या हस्ते मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी नवजात बालक व बालिकांना ड्रेसचे वाटप करण्यात आले.


तसेच जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या सूचनेनुसार रुग्णांच्या नातेवाईकांचे सुध्दा अभिनंदन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी मातांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहित केले. 


तसेच अॅड. राधा नरवलिया यांनी मुलींच्या जन्माचे व शिक्षणाचे महत्व पटवून दिले. पीसीपीएनडिटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी बक्षिस योजनेबाबत सर्व माता रुग्णांना माहिती दिली. त्याबरोबर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमांतर्गत अनधिकृत गर्भपात, गर्भलिंग तपासणीबाबत तक्रार असल्यास टोल फ्रि क्रमांक १८००२३३४४७५ तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ८४५९८१४०६० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. 


ही माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल याबाबत स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालय वाशिम येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


0 Response to "जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article