-->

७ हजार ५५२ कुणबी जातीची प्रमाणपत्रे निर्गमित

७ हजार ५५२ कुणबी जातीची प्रमाणपत्रे निर्गमित

 


साप्ताहिक सागर आदित्य 

७ हजार ५५२ कुणबी जातीची प्रमाणपत्रे निर्गमित


वाशिम,  : मराठवाडा विभागात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार या समितीची कार्यकक्षा राज्यभर करण्यात आली आहे. समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात सन १९६७ पूर्वीच्या कुणबी, कुणबी- मराठा, मराठा-कुणबी जातीच्या नोंदी शोधणे तसेच नोंदी आढळलेले अभिलेख संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहे.


शासन निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर नोंदी शोधण्यासाठी विविध कक्ष, विविध विभाग व मोठ्या प्रमाणात अधिकारी / कर्मचारी यांचा वापर करुन नोंदी शोधण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या ३ लक्ष ३० हजार ९१७ नोंदी विविध अभिलेखांमध्ये आढळल्या आहे. यामध्ये महसूल विभाग - ३ लक्ष ६ हजार २९६, शिक्षण विभाग- १४ हजार ९६८, नगरपालिका प्रशासन - २ हजार ९९८, भुमि अभिलेख ६ हजार १०२, पोलिस विभाग- ५०४, नोंदणी व मुद्रांक शुल्क-९ व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ४० अशा विभागनिहाय नोंदी आढळून आलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या ३ लक्ष ३० हजार ९१७ आढळुन आलेल्या नोंदींपैकी आज रोजीपर्यंत स्कॅनिंग होवून २ लक्ष २५ हजार ४५४ नोंदी जिल्हयाच्या संकेतस्थळावर अपलोड / प्रसिध्द करण्यात आल्या आहे. उर्वरित आढळुन आलेल्या नोंदींचे काम जिल्हयाच्या संकेतस्थळावर अपलोड / प्रसिध्द करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. २४ जानेवारीपर्यंत जिल्हयामध्ये एकुण ७ हजार ५५२ कुणबी जातीची प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी दिली.



0 Response to "७ हजार ५५२ कुणबी जातीची प्रमाणपत्रे निर्गमित"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article