
सीबीएससी निकालामध्ये सनराईज इंग्लिश स्कूल च्या यशाची परंपरा कायम
साप्ताहिक सागर आदित्य
सीबीएससी निकालामध्ये सनराईज इंग्लिश स्कूल च्या यशाची परंपरा कायम
रिसोड - दि आर्य शिक्षण संस्था रिसोड द्वारा संचालित सनराईज इंग्लिश स्कूल रिसोडचा १२ मे 2023 रोजी सीबीएसई मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली
या परीक्षेत कृष्णा सानप याने 91.20% गुण पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच कु. दर्शनी पवार 90.80%, कु. हर्षा नागरे 90%, कु. प्राची लेमाडे 89.80%, कु. अपूर्वा मानधने 89.40%, साहिल लढ्ढा 89.20% यासह 80% ते 90% या श्रेणीमध्ये 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्यांनी आपल्या यशाचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार अनंतराव देशमुख तसेच शाळेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई देशमुख, चैतन्यभैय्या देशमुख, एड. नकुलदादा देशमुख यांचे मार्गदर्शन तसेच शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य व शिक्षकांना दिले आहे. आपल्या यशामध्ये शाळेने राबविलेले विविध उपक्रम व तसेच मेडिटेशन व योगा या सर्वांचा प्रमुख वाटा असल्याचे यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले शाळेच्या लागलेल्या उत्तम निकालामध्ये पालकांमध्ये उत्साहाचे तसेच समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
0 Response to "सीबीएससी निकालामध्ये सनराईज इंग्लिश स्कूल च्या यशाची परंपरा कायम"
Post a Comment