
गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार बीजेएसच्या प्रचार रथाचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला शुभारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार
बीजेएसच्या प्रचार रथाचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला शुभारंभ
वाशिम, : " गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार " या अभियानासाठी भारतीय जैन संघटनेने तयार केलेल्या प्रचार रथाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, मृदा व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, तांत्रिक सहाय्यक मयूर हुमणे, श्री. कोल्हे, भारतीय जैन संघटनेच्या सुजलाम सुफलाम प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, व्यवस्थापक अंकुश परांजळे, तालुका समन्वयक प्रफुल बानगावकर व सचिन लांडे यांची उपस्थिती होती.
जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त वतीने जिल्हयात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानाचा गावागावात प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेच्या प्रचार रथाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रत्येक गावापर्यंत आपलं गाव जलसमृद्ध करावं, गाव जल आत्मनिर्भर करावं असा प्रचार या रथाच्या माध्यमातून गावपातळीवर करुन जनजागृती करण्यात येणार आहे. प्रचार रथाच्या माध्यमातून 600 एकर क्षेत्राच्या आतमधील तलावाचे पुनरुज्जीवन म्हणजेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या अभियानाचा प्रचार गावागावात करण्यात येणार आहे.
0 Response to "गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार बीजेएसच्या प्रचार रथाचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला शुभारंभ"
Post a Comment