
21 ते 30 एप्रिल दरम्यान जिल्हास्तरीय ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीर
साप्ताहिक सागर आदित्य
21 ते 30 एप्रिल दरम्यान
जिल्हास्तरीय ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीर
वाशिम, : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम, विविध खेळ संघटना आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र वाशिमच्या संयुक्त वतीने जिल्हयात विविध खेळांचे खेळाडू तयार व्हावेत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्याकरीता खेळाडूंना विविध खेळांचे अनुभवी प्रशिक्षकांकडून खेळाची सर्व माहीती मिळावी हा दृष्टीकोन समोर ठेवून जिल्हास्तरीय ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 21 ते 30 एप्रिल या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे करण्यात आले आहे.
यामध्ये धनुर्विद्येकरीता अनिल थर्डर, कबड्डी खेळाकरीता शेख अब्दुल व किशोर बोंडे, खो-खोकरीता बालाजी शिरसीकर व योगेश काळे, मैदानी खेळाकरीता चेतन शेंडे, प्रदिप बोडखे, संजय शेंडे व गफुर पप्पुवाले, रायफल शुटींगकरीता प्रल्हाद आळणे, कुस्तीकरीता पांडुरंग गादेकर, क्रिकेटकरीता विक्की खोबरागडे, बॅडमिंटनकरीता अर्शद खान, फुटवॉल रफिक मामु, कराटे सुनिल देशमुख, बॉक्सिंग/किक बॉक्सिंग रणजित कथडे, वेटलिफ्टींग नारायण ठेंगडे, बॉस्केटबॉल श्री. पठाण व धनराज चव्हाण, शुटींगबॉलकारीता अप्पा राजे, स्पोर्ट डान्स छोटु पट्टेबहादुर, तायक्वॉंदो रणजित कथडे व चंद्रसेण इंगोले, तलवारबाजी गोलु नेसनतकर, टेबल टेनिस राजदिप मनवर, लॉन टेनिस आशिष पट्टेबहादुर, सॉफ्ट टेनिस संदिप मनवर व राजेंद्र सौदागर व ज्युदो सुनिल देशमुख आदी खेळांचे तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण शिबीरामध्ये जिल्हयातील शालेय व शाळाबाहय मुला- मुलींना या प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येईल. प्रशिक्षण शिबीर अनिवासी असून विनामुल्य राहणार अहे. वरील विविध खेळप्रकारातील खेळाचे प्रशिक्षण शिबीरामध्ये ८ ते १८ वर्ष वयोगटातील मुलां-मुलींना प्राधान्य देण्यात येणार आहे. खेळांचे प्रशिक्षण शिबीर हे जिल्हा संकुल, वाशिम येथे आयोजीत करण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज संबंधीत प्रशिक्षकांकडून २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे मिळतील. हे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे व बालाजी शिरसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. तरी या प्रशिक्षण शिबीराचा जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.
0 Response to "21 ते 30 एप्रिल दरम्यान जिल्हास्तरीय ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीर"
Post a Comment