-->

क्षयरोग दिनानिमित्त रॅली  क्षयरोगाबाबत केली जनजागृती

क्षयरोग दिनानिमित्त रॅली क्षयरोगाबाबत केली जनजागृती

 


साप्ताहिक सागर आदित्य 

क्षयरोग दिनानिमित्त रॅली

क्षयरोगाबाबत केली जनजागृती

वाशिम, जिल्हा क्षयरोग केंद्र, वाशिमच्यावतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग जनजागरण रॅलीचे आयोजन आज २४ मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे  करण्यात आले.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.

विजय काळबांडे यांनी रॅलीला

हिरवा झेंडा दाखविला.यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस व्ही. देशपांडे,जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.मिलींद जाधव, डॉ.यादव,अति.जिल्हा

शल्यचिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर, डॉ.हेडाऊ,डॉ.बगाटे,डॉ.बाहेती, डॉ.देवळे,डॉ.साबू डॉ.गोरे,श्री.गुलाटी यांची उपस्थिती होती.

       रॅलीमध्ये शासकीय नर्सिंग कॉलेज प्रशिक्षण विद्यालय,नॅझरीन नर्सिंग कॉलेज,मदर टेरेसा नर्सिंग

कॉलेज,माँ.गंगा नर्सिंग कॉलेज व मानसी नर्सिंग कॉलेज, सावित्रीबाई फूले नर्सिंग विद्यालय,गोविंदराव देंशपाडे नर्सिंग कॉलेज,राजश्री शाहु कॉलेज,श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थी तसेच जिल्हा क्षयरोग

केंद्र,जिल्हा कुष्ठरोग कार्यालय, एआरटी सेंटर व जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व अधिकारी

व कर्मचारी सहभागी झाले होते.

     डॉ.देशपांडे यांनी रॅली राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाची व जिल्हयातील क्षयरुग्यांना सुरु असलेल्या दैनंदिन उपचार पध्दतीबाबत माहिती देऊन क्षयरोग उच्चाटनासाठी सर्वांच्या एकजुटीची गरज असल्याचे सांगीतले. 

       राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र नागपुरचे संचालक डॉ.विजय डोईफोडे यांनी क्षयरोग कोणालाही होऊ शकत असल्याने याबाबत सर्वांनी दक्ष राहण्याबाबत व लोकशिक्षण देण्याबाबत सांगितले.तसेच

सर्वजण मिळुन देश टीबीमुक्त करुया असे आवाहन केले. 

         डॉ.विजय काळबांडे यांनी क्षयरोगावर उपचाराबरोबर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगत क्षयरोग लढ़यात सर्वानी योगदान देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. 

         यावेळी २३ मार्च २०२३ रोजी आयोजित रांगोळी स्पर्धतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच जिल्हातील राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत निदेशाकांनुसार उत्कृष्ट काम करणा-या तालूका आरोग्य अधिकारी,ग्रामिण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र सहाय्यक आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.

     जनजागृती रॅलीचा अकोला नाका, पाटर्णी चौक,डॉ.आंबेडकर चौक,बस स्टॅंड चौक मार्गे जिल्हा क्षयरोग केंद्रात  समारोप झाला.उपस्थितांना माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

      रॅली समारोपानंतर आशा,खाजगी वैद्यकीय व्यवसायीक, एनजीओपीपी व निक्षय मित्र यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  लॉयन्स क्लबच्या वतीने निक्षय मित्र योजनेअंतर्गत ६ ० प्रोटीन पावडर डब्बे क्षयरुग्णांना देण्याकरीता वाटप करण्यात आले. संचालन अशोक भगत व आभार समाधान लोनसुने यांनी मानले.

Related Posts

0 Response to "क्षयरोग दिनानिमित्त रॅली क्षयरोगाबाबत केली जनजागृती"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article