-->

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न




 साप्ताहिक सागर आदित्य 

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,रिसोड येथे दिनांक १२/०८/२०२२ शुक्रवारला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शाळेतील स्व.विठ्ठलराव देशमुख सभागृहात अतिशय उत्साहात संपन्न झाला.

या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान दि.आर्य शिक्षण संस्थेचे सचिव माननीय ॲड. नकुल दादा देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी मध्ये संस्थेचे विश्वस्त  नरेंद्र मामा देशमुख,श्री रंगनाथ आप्पा जिरवणकर तसेच  संजयजी उकळकर साहेब हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला संस्थेअंतर्गत सर्व शाळांचे प्राचार्य/ मुख्याध्यापक उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यामध्ये माननीय  नकुल दादा देशमुख यांचा सत्कार शाळेचे प्राचार्य  राजेश नंदकुले सर यांनी केला. यानंतर वर्ग आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायन करून सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत केले. यानंतर शाळेचे प्राचार्य  राजेश नंदकुले सर यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शाळेचा वाढता आलेख आपल्या प्रास्ताविक मध्ये सादर केला. संस्थेचे सचिव   भाऊसाहेब देशमुख व संस्थेच्या विश्वस्त  सौ.बाईसाहेब देशमुख यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली १९९६ मध्ये स्थापन केलेला विशेष शैक्षणिक उपक्रम अंतर्गत पहिल्यावर्षी ९०% च्या वरील ०२ विद्यार्थ्यापासून ते आज २०२२ मध्ये ही संख्या १५० पर्यंत येऊन पोहोचलेली आहे ही बाब संस्थेसाठी अतिशय गौरवास्पद आहे असे त्यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये नमूद केले.या कार्यक्रमाला सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे सन्माननीय पालक तसेच शाळेचा सर्व हितचिंतक वर्ग उपस्थित होता. या सत्कार समारंभामध्ये ९०% वरील वर्ग १०वी चे एकूण १४० विद्यार्थी,वर्ग १२वी विज्ञान चे ५२ विद्यार्थी व कला शाखा आणि वाणिज्य शाखा यामधील सर्वप्रथम प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र व शील्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सन्माननीय ॲड. नकुल दादा देशमुख यांनी शाळेच्या निकालाबाबत अतिशय समाधान व्यक्त केले तसेच शाळेवर पालक वर्गांचा जो विश्वास आहे,तो विश्वास कायम ठेवण्याचे आवाहन सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना केले व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा कौतुक व अभिनंदन केले.कार्यक्रमाचे संचलन  पी.एन. देशमुख सर तसेच आभार प्रदर्शन भारत माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळेचे पर्यवेक्षक,  भांडेकर सर यांनी व्यक्त केले.

                          





0 Response to "भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article