
रिसोड तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यात शासकीय योजनाची माहिती देणारे शिबीर राबवा - गटविकास अधिकारी रिसोड सोळुंके यांना दिले निवेदन - सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे पाटील
साप्ताहिक सागर आदित्य
रिसोड तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यात शासकीय योजनाची माहिती देणारे शिबीर राबवा - गटविकास अधिकारी रिसोड सोळुंके यांना दिले निवेदन - सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे पाटील
आज रिसोड चे गटविकास अधिकारी सोळुंके साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी केली की महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध योजना राबवण्यात येतात,त्या योजनांची खेड्यापाड्यातील जनतेला बराच वेळा माहिती होत नाही घरकुल योजना, अपंग योजना,दिव्यांगांच्या योजना, पंचायत समिती अंतर्गत फळबाग कोठा विहीर अशा अनेक योजना ची माहिती गरजू सर्वसामान्य पर्यंत अक्षरशः पोहोचत नाहीत, अनेक लोक यापासून वंचित राहतात, आणि निकषानुसार फाईल न निवड करता पात्र लाभार्थी डावलून राजकीय हेतू व व्यवहाराच्या दृष्टिकोनातून निकषात नसलेल्या अपात्र लाभार्थ्यांना पात्र करून सरपंच यांच्या संगमताने पात्र केलेल्या अनेक गोष्टी दिसून येत आहेत, तरी आपण यापुढे प्रत्येक योजनाची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील भिसडे यांनी केली आहे,रिसोड तालुक्यातील प्रत्येक गावी ज्या लोकांचे गावामध्ये वर्चस्व राजकीय वलंय आहे त्यांचीच कामे होतं आहेत त्याकरिता यापुढे गरजू लोकांना न्याय मिळाला पाहिजे, गोरगरीब जनतेची कामे नाही झाल्यास संपूर्ण तालुक्यातील लोकांचे ऑफिस समोर आमरण उपोषण करू असा इशारा गोपाल भिसडे यांनी दिला आहे,,
होतील.
0 Response to "रिसोड तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यात शासकीय योजनाची माहिती देणारे शिबीर राबवा - गटविकास अधिकारी रिसोड सोळुंके यांना दिले निवेदन - सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे पाटील"
Post a Comment