
वाशिम शहरातील पुसद रोड वरील उड्डाणपूलावरील स्ट्रीट लाईट व दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम लवकर सुरू करा.
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम शहरातील पुसद रोड वरील उड्डाणपूलावरील स्ट्रीट लाईट व दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम लवकर सुरू करा.. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे सैनिक रितेश देशमुख यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी यांना दिला..
वाशिम:- वाशिम शहरातील स्थानिक वाशिम पुसद रोड वरील उड्डाण उदघाटन करून राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी श्रेय लाटण्याचे काम केले परंतु उदघाटन होऊन दोन ते तीन महिने होऊन सुद्धा आतापर्यंत दोन्ही बाजूचां रास्ता काही झाला नाही व स्ट्रीट लाईट सुद्धा लावले नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम संबंधित प्रशासन करीत आहे . उडानपुरावरील स्ट्रीट लाईटची व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अनुसूचित प्रकार घडत आहे. या अंधाराचा फायदा घेत अनेक मद्यप्रेमीचांगलेच फावत आहे . फुटपाथवर बसून पिणारा मध्यप्रेमीं चा तोल जाऊन अपघात झाल्यास वाहनधारकाच्या जिवावरही बेतू शकन्याची दाट शक्यता आहे. पुलावर लाईटाची नितांत आवश्यकता असून ,व पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याची दुरवस्था होऊन अनेक अपघात झाले बाजूलाच रुग्णालय असल्यामुळे अनेक रुग्णांना रस्त्याचा त्रास होत आहे. येत्या सात दिवसात उड्डाणपूल वरील स्ट्रीट लाईट लावण्यात यावी व रास्ता बांधण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात असा इशारा मनसे सैनिक रितेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला. यावेळी उपस्थित मनसे सैनिक उमेश टोलमारे, आबा सोनटक्के, वैभव काळे, उदय जामकर, अनेक मनसे सैनीक उपस्थित होते.
0 Response to "वाशिम शहरातील पुसद रोड वरील उड्डाणपूलावरील स्ट्रीट लाईट व दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम लवकर सुरू करा."
Post a Comment