-->

समतेचे जनक, विश्वगुरु,विश्वजोती,  लोकशाही जनक ,लिंगायत धर्मसंस्थापक,कल्याणकारी , अर्थशास्त्रांचे जनक महात्मा बसवेश्वर - गोपाल भिसडे

समतेचे जनक, विश्वगुरु,विश्वजोती, लोकशाही जनक ,लिंगायत धर्मसंस्थापक,कल्याणकारी , अर्थशास्त्रांचे जनक महात्मा बसवेश्वर - गोपाल भिसडे


साप्ताहिक सागर आदित्य/

समतेचे जनक, विश्वगुरु,विश्वजोती,  लोकशाही जनक ,लिंगायत धर्मसंस्थापक,कल्याणकारी , अर्थशास्त्रांचे जनक महात्मा बसवेश्वर - गोपाल भिसडे

महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी होते.
जगातल्या पहिल्या लोकसंसदेचे निर्माते, लोकशाहीचे जनक, विश्वाला विश्वासात घेऊन, विश्वात एकरूप होण्याचा इष्टलिंग मार्ग दाखविनारे, जातीपातींना पायदळी तुडवत अखंड मानव एक करून जगाला समतेचा संदेश देणारे समतासुर्य, समतानायक, क्रांतीसुर्य, विश्वगुरु महात्मा बसवेश्वर
कायकवे कैलास, महान समाज सुधारक समता समरसतेचे प्रवर्तक
कळबेड ,कोळबेड,हुसीय नुडी यलबेड,अन्यरिगे असहाय्य पडवेड तन्न बन्नीस बेड इदिरी हळएलू बेड ईदे अंतरंग शुद्धि ईदे नम्म कुंडल संगमदेव देव नुली सुवपरी।।
याचा अर्थ चोरी करू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको ,रागावू नको ,दुसऱ्यांना हीन लेखू नकोस तर सर्वांना साहाय्य करत राहा. स्वतःची स्तुती करू नकोस,दुसऱ्याची निंदा करू नकोस,मनाची आणि अंत:करणाची हीच खरी सिद्धी आहे .महात्मा बसवेश्वर म्हणतात, या वचनाचा आचरणाने तु कुंडल संगम देवापाशी जाऊन पोहोचशीली अर्थात मोक्ष मिळवशील।।
12व्या शतकात मंगळवेढा येथे जगातील पहिला लोकशाही संसद म्हणजे अनुभव मंडपाची स्थापना करून महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवणारे विश्वगुरु महामानव क्रांतिसूर्य जगतजोती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विनम्र अभिवादन सर्व समाज बांधवांना कोटी कोटी शुभेच्छा...

 




 

0 Response to "समतेचे जनक, विश्वगुरु,विश्वजोती, लोकशाही जनक ,लिंगायत धर्मसंस्थापक,कल्याणकारी , अर्थशास्त्रांचे जनक महात्मा बसवेश्वर - गोपाल भिसडे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article