कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा ( अहिंसातिर्थ), येथे आत्मनिर्भर शेतकरी अभियान रॅलीचे भव्य स्वागत
साप्तहिक सागर आदित्य/
कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा ( अहिंसातिर्थ), येथे आत्मनिर्भर शेतकरी अभियान रॅलीचे भव्य स्वागत
कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा ( अहिंसातिर्थ), आत्मनिर्भर शेतकरी अभियान रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला ब्रह्मकुमारी स्नेहलता दीदी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी माननीय डॉ. माणिकराव जोगदंड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.
प्रमुख पाहुण्या ब्रह्मकुमारी स्नेहलता दीदी यांनी "योगिक शेती" या विषयावर मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर कसे बनवता येईल यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोगदंड यांनी केले. माननीय अविनाश जोगदंड यांनी अभियानाचे उद्दिष्ट समजावून सांगितले.
या कार्यक्रमाला आत्मनिर्भर शेतकरी अभियानाचे पदाधिकारी, माणिकराव जोगदंड, राम जोगदंड, राजेश घुगे, सौ. मनोरमा आई जोगदंड, अविनाश मार्शेटवार, गावातील प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी_ विद्यार्थिनी, कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आर. एस. करंगामी, प्रा.अमित मंडलिक प्रा. वाय.डी. गवळी आणि प्रा. ए. पी. वाठोरे कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला कृषि महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अविनाश जोगदंड आणि कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Response to "कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा ( अहिंसातिर्थ), येथे आत्मनिर्भर शेतकरी अभियान रॅलीचे भव्य स्वागत"
Post a Comment