राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य समन्वयक सुहास उभे यांचा वाशिम दौरा
साप्ताहिक सागर आदित्य/
कारंजा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य समन्वयक सुहास उभे यांचा आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे विविध सेल आढावा दौरा निमित्त आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांच्या कडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुहास उभे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय कारंजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांच्या कडून प्रत्येक सेलचा आढावा घेतला व पक्ष संघटन मजबूत करण्याविषयी मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ बी सेल प्रदेश सचिव राजु गुल्हाने , राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रमोद चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेलचे जिल्हा अध्यक्ष पवन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य समन्वयक सुहास उभे यांचा वाशिम दौरा"
Post a Comment