स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीमधे, युवा स्वाभीमान पार्टीचे पूर्ण पॅनल उभे करून निवडून येऊन इतिहास घडवीणार! - नितिन नरवाले
साप्ताहिक सागर आदित्य/
स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीमधे, युवा स्वाभीमान पार्टीचे पूर्ण पॅनल उभे करून निवडून येऊन इतिहास घडवीणार! - नितिन नरवाले .
कारंजा[लाड] : आरक्षणामुळे निवडणूका सहा महिने लांबणीवर पडलेल्या असल्या तरीही, विविध पक्षांनी, नगर परिषद निवडणूकाची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली असून, त्या संदर्भात कारंजातील युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांची नुकतीच अमरावती येथे, संस्थापक अध्यक्ष आ.रविभाऊ राणा यांचे अध्यक्षतेखाली आणि खासदार नवनीत राणा यांचे मार्गदर्शनात बैठक पार पडली असल्याचे अधिकृत वृत्त वाशिम जिल्हा युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीनजी नरवाले यांनी याविषयी अधिक बोलतांना सांगीतले की, "गेल्या पंचवार्षिक मध्ये कारंजेकर नागरिकांनी, वंचित बहुजन पक्षाला बहुमताने एकहाथी सत्ता दिलेली होती परंतु त्यांना कारंजा शहर विकासाची कामे करता आलीच नाही . यावेळी मात्र कारंजेकराचा कल, प्रस्थापित पक्ष आणि प्रस्थापित नेते यांना सोडून, नवतरुणांना संधी देण्याकडे दिसून येत आहे . कारंजेकर नागरीकांना आता फक्त कारंजाचा विकास व त्यांच्या मुला मुलीची कुटूबांची खात्रीपूर्वक सुरक्षा हवी आहे . त्या दृष्टिने ते राणा दाम्पत्याच्या, युवा स्वाभिमान पक्षाकडे पहात आहेत" . आमचेवर जर कारंजाच्या मतदार नागरिकांनी विश्वास दाखवून आम्हाला निवडून दिले तर आम्ही सत्तेत येताच खड्डेमुक्त रस्त्यांचे शहर आपणास देऊ, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण आणि डॉ . आंबेडकर चौकात, भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचा पुतळ्याची स्थापना करू, नगर पालिका कर्मचारी व सफाई कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार, नियमीत वेतन देऊ आणि त्यांच्या हातून कारंजा शहर, स्वच्छ कारंजा - हरित कारंजा - विकसित कारंजा निर्माण करू . स्थानिक कारंजेकर नागरिकांना न प च्या माध्यमातून उद्योग व्यवसायाच्या विविध संधी निर्माण करून देऊन, रोजगार उपलब्ध करून देऊ असे सुध्दा नितीनजी नरवाले यांनी स्पष्ट केले आहे . आता बघू या कारंजाचा मतदार राजा, एकदा युवा कार्यकर्त्यांना संधी देऊन, संधीचे सोने करून घेणार काय ?
0 Response to "स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीमधे, युवा स्वाभीमान पार्टीचे पूर्ण पॅनल उभे करून निवडून येऊन इतिहास घडवीणार! - नितिन नरवाले"
Post a Comment