डॉ. समिक्षा गावंडे यांना, महिला दिनानिमित्त, " ज्ञानमूर्ती " प्रदान!
साप्ताहिक सागर आदित्य/
डॉ. समिक्षा गावंडे यांना, महिला दिनानिमित्त, " ज्ञानमूर्ती " प्रदान!
कारंजा : जागतिक महिला दिनाचे औचित्याने, स्थानिक ज्ञानगंगा साहित्य मंडळ कारंजा कडून, शिवसेना कार्यालयात, कारंजा शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली, ज्ञानगंगा साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे, जिल्हाध्यक्ष ओंकार मलवळकर, युवासेना शहर प्रमुख शंभूराजे जिचकार, शेषराव पाटील इंगोले, कैलास हांडे, डॉ गजानन गावंडे, उमेश अनासाने, मनोज बढोने [ कुंभार ], सौ छायाताई गावंडे, सौ सरलाताई इंगोले यांचे उपस्थितीत, ज्ञानगंगा साहित्य मंडळातर्फे, वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगीरीबद्दल पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन, "ज्ञानमूर्ती " राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले . तसेच महिलादिनानिमित्त स्थानिक शिवसेनेकडून सुद्धा, सौ छायाताई गावंडे, सौ सरलाताई इंगोले, डॉ समिक्षा गावंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .
0 Response to "डॉ. समिक्षा गावंडे यांना, महिला दिनानिमित्त, " ज्ञानमूर्ती " प्रदान!"
Post a Comment