-->

आमखेडा गावातील नागरिकांच्या कामाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने

आमखेडा गावातील नागरिकांच्या कामाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने


साप्ताहिक सागर आदित्य/

आमखेडा गावातील नागरिकांच्या कामाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने

 
आमखेडा -
आपला संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अनुषंगाने गीताई ह्युमन डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे हे राष्ट्रगीत सन्मान अभियान वाशिम जिल्ह्यामध्ये राबविणार आहे.भारतातील प्रत्येक नागरिकांनी देश अभिमान बाळगून रोज नियमितपणे सामूहिक गायन करावे व राष्ट्रप्रेम प्रत्येक  नागरिकांमध्ये रुजावे, राष्ट्रउभारणीसाठी प्रत्येकाने काम करावे यासाठी हे अभियान सुरू करत आहेत  या अभियानाला आपण साथ देऊ. वाशिम जिल्ह्यामध्ये या अभियानाची सुरुवात ग्राम आमखेडा येथे शहाजी पवार अप्पर जिल्हाधिकारी वाशिम,  निकम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम, शंकर तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम, वाय. पी. खंडेतोड सहाय्यक अधिष्ठाता कृषी विद्यापीठ दापोली एन.आर. कोष्टी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, प्रकाश सोळंकी तांत्रिक अधिकारी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, गीते साहेब महाबिज महासंचालक वाशिम कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष अविनाश जोगदंड , नितीन जोगदंड  जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाशिम ,सरपंच तसेच सदस्य ग्रामपंचायत आमखेडा, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव साहेब सर्व विद्यार्थी व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत दी. ०९-०३-२०२२ ला या राष्ट्रगीत सन्मान अभियानाला आमखेडा येथे सुरुवात झाली.

 

 




0 Response to "आमखेडा गावातील नागरिकांच्या कामाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article