श्रीक्षेत्र गणेशपूर येथे वैराग्यमुर्ती संत कैलासबाबा यांचा वार्षिकोत्सव व महाप्रसाद संपन्न !
साप्ताहिक सागर आदित्य/
श्रीक्षेत्र गणेशपूर येथे वैराग्यमुर्ती संत कैलासबाबा यांचा वार्षिकोत्सव व महाप्रसाद संपन्न !
कारंजा : वैराग्यमुर्ती श्री संत कैलासनाथ महाराज यांचा दरवर्षी होणार भव्य वार्षिकोत्सव शुक्रवार दि .04/03/2022 रोजी श्रीक्षेत्र गणेशपूर येथील शेतातील, श्री संत कैलासनाथ महाराज मंदिरावर पार पडला असून, त्यानिमित्त श्री कैलासबाबा यांची महाआरती, व भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते तथा जिल्हा उपप्रमुख, तसेच इतर भाविकांमध्ये प्रमोद शेगोकार, जहिरभाई, पत्रकार संजय कडोळे, पदमाकर महाराज कडू पाटील व शेकडो भाविक भक्त मंडळीची उपस्थिती होती . यावेळी श्री संत कैलासनाथ महाराज यांनी, संजय कडोळे यांना स्वतःजवळ बसवून महाप्रसाद दिला . त्यावर बोलतांना, संजय कडोळे म्हणाले, "जवळ जवळ मी विस वर्षापासून संत कैलासबाबा यांचे सेवेत आहे . त्यांच्याच आशिर्वादाने मी संकटमोचन हनुमान मंदिराची उभारणी होण्याचे स्वप्न पूर्ण करु शकलो . तसेच त्यांच्याच आशिर्वादाने व त्यांच्या हस्ते मी विदर्भ लोककलावंत संघटना स्थापन केली होती व शेकडो कलावंताना मार्गदर्शनासह काही लोककलाकारांना मानधन सुरु करू शकलो . संत कैलास बाबा च्या आशिर्वादात अनमोल धनाचा ठेवा सामावलेला असल्याचे त्यांनी सांगीतले .
0 Response to "श्रीक्षेत्र गणेशपूर येथे वैराग्यमुर्ती संत कैलासबाबा यांचा वार्षिकोत्सव व महाप्रसाद संपन्न !"
Post a Comment