१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी; घरबसल्या असा बुक करा स्लॉट
साप्ताहिक सागर आदित्य/
१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी; घरबसल्या असा बुक करा स्लॉट
मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांची कमी होणारी रुग्णसंख्या आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. एकीकडे डेल्टाचे (Coronavirus Delta Variant) रुग्ण सापडत असताना दुसरीकडे कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचे (Omicron Variant) रुग्णही वाढताना दिसत आहेत.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणाची मोहीम अधिक जलद करण्यात आली आहे. याचदरम्यान सरकारनं १५ ते १८ या वयोगटातील मुलांसाठीही लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली आहे.यासाठी शनिवारपासून म्हणजेच आजपासून कोविन पोर्टलवर नोंदणीलाही सुरुवात करण्यात आली आहे. २५ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) यांनी १५ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची सुरूवात करणार असल्याची घोषणा केली होती. लसीकरणाची सुरुवात ३ जानेवारी पासून केली जाणार आहे.तर दुसरीकडे आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रन्टलाईन व्हर्कर्ससाठीही सरकारनं मोठी घोषणा केली आहे. त्यांच्यासाठी लसीचा तिसरा प्रिकॉशन डोस (Precaution Dose) देण्यात येणार आहे. याची सुरूवात १० जानेवारी म्हणजेच सोमवारपासून केली जाणार आहे.१५ ते १८ या वयोगचातील लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. या वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिन (Covaxin) या लसीचे डोस देण्यात येणार आहेत.कोव्हॅक्सिनचे अतिरिक्त डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवले जाणार आहे. तसंच लसीकरणादरम्यान, मार्गदर्शक सूचनांचंही पालन करावं लागेल. लस घेतल्यानंतर केंद्रावर अर्धा तास थांबावं लागेल आणि पहिल्या लसीनंतर २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस देण्यात येईल.
9764614858
ReplyDelete