वारे सरांच्या निलंबनामागे शिक्षणाचे बाजारीकरण करणार्या प्रवृतीचा हात !
जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना शाळा बचाव समितीचे सदस्य
साप्ताहिक सागर आदित्य/
वारे सरांच्या निलंबनामागे शिक्षणाचे बाजारीकरण करणार्या प्रवृतीचा हात !
- जिल्हा परिषद शाळा बचाव समितीचा आरोप
- शाळा बचाव समिती व सत्यशोधक शिक्षक सभेच्या वतीने शिक्षण मंत्र्यांना निवेदन
वाशिम ( दि. २४ डिसेंबर ) : जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार्या पुणे जिल्ह्यातील (ता.शिरुर) बावळेवाडीचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे निलंबन राज्य शासनाने तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी सत्यशोधक शिक्षक सभा व जि.प. शाळा बचाव समितीच्या वतीने दि. 24 डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठवलेल्या निवेदनानुसार , या निलंबनामागे शिक्षणाच्या बाजारीकणाचा व प्रस्थापित राजकीय शक्तीचा हात असल्याचा आरोप या संघटनांच्या वतीने करण्यात आला.
याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, वाबळेवाडी (जि.पुणे) येथील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय मानांकन स्तरावर पोहोचली आहे. याकामी या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचा सिंहाचा वाटा आहे. शाळेतील भौतिक सोयी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचणे एवढेच या शाळेचे वैशिष्ट्य नाही तर एका मर्यादित अर्थाने गुणवत्तापुर्ण शाळा म्हणुनही या शाळेची समाज मान्यता आहे. यासाठी या शाळेतील सर्व गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाच्या कळवळीतुन वारे यांनी काम केले आहे. प्रसंगी सकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत त्यांनी शाळेत काम केले. त्यांची तळमळ व समर्पितता यातुन त्यांनी शाळा व समाज यांचे एकजीनसी नाते तयार केले. शासनाच्या अतिरिक्त मदतीवर अवंलबुन न राहता लोकसहभागातुन साधन संपन्न आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळा त्यांनी निर्माण केली.
शोषित, पिडीत जातवर्गाच्या शिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस विदारक बनतो आहे. अशा वेळी दत्तात्रय वारे यांच्या प्रयत्नांचे स्वागतच करावे लागते. मात्र, काही थातूर - मातूर कारणे दाखवून तसेच या शाळेच्या परिघाच्या बाहेरच्या व्यक्तींच्या तक्रारीला अनुसरुन अशा आदर्श मुख्याध्यापकास निलंबित करणे हे निषेधार्य असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. या शाळेचा व येथील शिक्षकांचा आदर्श घेऊन शेकडो शाळा आणि हजारो शिक्षक जिल्हा परिषद शाळांना व विद्यार्थ्यांना आदर्श बनवत आहेत. असे असतांना दत्तात्रय वारे यांच्यावरील निलंबनाची कारवाई तमाम विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या भावना दुखावणारी आहे. आदर्श शिक्षकांवर अश्या प्रकारे चुकीच्या कारवाया होत राहिल्यास राज्यभरातील ईतर शिक्षकही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास धजावणार नाहीत आणि आपले कौशल्य पणाला लावणार नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची दैनावस्था बघावयास मिळेल.
दत्तात्रय वारे यांच्या निलंबनाने शिक्षण हे हितसंबंधीय व राजकीय हस्तक्षेपाचे कारण बनले असल्याचा संदेश समाजामध्ये जात आहे. त्यांच्या निलंबनामागे शिक्षणाच्या बाजारीकरणाची प्रवृत्ती व प्रस्थापीत राजकीय शक्ती काम करत असल्याचा आरोत या निवेदनाद्वारे केला आहे.
हे प्रकरण वरवर पाहता एका शिक्षकाच्या निलंबनापुरतं मर्यादित नसुन "मुठभरांचे शिक्षण की शिक्षणाचे सार्वत्रिकरण" हा संघर्ष निर्माण करतो.
त्यामुळे दत्तात्रय वारे यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निलंबन रद्द न झाल्यास वाशिम जिल्ह्यातील सत्यशोक्षक शिक्षक सभा व जिल्हा परिषद शाळा बचाव समितीच्या पुढाकाराने विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा ईशारा देण्यात आला.
निवेदनावर सत्यशोधक शिक्षक सभेचे राज्यस्तरीय सधस्य व जि. प. शाळा बचाव समिती वाशिमचे मुख्य संयोजक गजानन धामणे, सुरेश इंगोले, शेख इसाक शेख परवेज, अनिल शिंदे, राजू शिंदे, संतोष आसोले, मिलिंद सुर्वे, गणेश शिंदे, संतोष गोरे, सीताराम वाशिमकर, अरविंद तांदळे, राम श्रृंगारे, एस पी. भगत यांच्या सह्या आहेत.
0 Response to "वारे सरांच्या निलंबनामागे शिक्षणाचे बाजारीकरण करणार्या प्रवृतीचा हात !"
Post a Comment