जल जीवन मिशन अंतर्गत कार्यक्रमांतर्गत आज पंचायत समिती सभागृह मंगरूळपीर येथे जल सुरक्षकांचे प्रशिक्षण!
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशिम दि. 24 :जल जीवन मिशन अंतर्गत पंचायत समिती सभागृह मंगरूळपीर येथे दि 23 रोजी संपन्न झाले. कारंजा मानोरा आणि मंगरूळपीर तालुक्याच्या प्रत्येकी 10 अशा एकूण 30 जलसुरक्षक यांचे FTK kit द्वारे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणा साठी जल जीवन मिशन चे संचालक गजानन वेले, जिल्हा कक्षाचे मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, क्षमता बांधणी तज्ञ प्रफुल काळे, पाणी गुणवत्ता सल्लागार अभिजित दुधाटे, प्रदीप सावळकर, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी वानखेडे विस्तार अधिकारी आरोग्य माहुलकर बी आर सी कर्मचारी प्रवीण आखाडे अभिजीत गावंडे प्रशांत राऊत अमोल घोडे व मोठ्या प्रमाणावर जलसुरक्षक उपस्थित होते यावेळी शुद्ध पाण्याचे महत्व तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले पाण्याची FTK kit द्वारे तपासणी तसेच 5 महिलांच्या प्रशिक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले
कार्यक्रमाचे संचालन बीआरसी प्रशांत राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण आखाडे यांनी केले.
0 Response to "जल जीवन मिशन अंतर्गत कार्यक्रमांतर्गत आज पंचायत समिती सभागृह मंगरूळपीर येथे जल सुरक्षकांचे प्रशिक्षण!"
Post a Comment