तीनशे किलोमिटर बीआरएम सायकल मोहीम यशस्वी
साप्ताहिक सागर आदित्य/
तीनशे किलोमिटर बीआरएम सायकल मोहीम यशस्वी
विविध जिल्ह्यातून २५ सायकलप्रेमींचा सहभाग
वाशीम सायकलस्वार व वाशीम रांदीनियर ग्रुपचा उपक्रम
वाशिम - गेल्या अनेक वर्षापासून ब्रेवेट सायकल स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणार्या वाशीम सायकलस्वार ग्रुप व वाशीम रॉदीनर ग्रुपच्या वतीने २६ डिसेंबर रोजी ३०० किलोमिटरची व सलग २० तासांची बीआरएम सायकल मोहीम यशस्वीरित्या पार पडली. मोहीमेमध्ये वाशीमसह अमरावती, यवतमाळ, दिग्रस व घाटंजी येथून २५ सायकलप्रेमींनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा प्रारंभ स्थानिक पाटणी चौक येथे सकाळी ६ वाजता करण्यात आला. त्यानंतर वाशीम, मंगरुळपीर, कारंजा, खेर्डा, बडनेरा, अमरावती, नांदगावपेठ, माहुली जहांगीर आणि त्याच मार्गे परत वाशिम असे २० तासाचे निर्धारीत अंतर सहभागी सायकलपटुंनी यशस्वीरित्या पार पाडुन मोहीम यशस्वी केली. मोहीम समाप्तीनंतर शर्मा पेट्रोल पंपाजवळ या सायकलस्वारांचे स्वागत करण्यात आले. सहभागी सायकलस्वारांनी सायकल स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानुन आपण प्रत्येक स्पर्धेत भाग घेवू व इतरांनाही यासाठी प्रेरीत करु असे मत व्यक्त केले. स्पर्धकांना मार्गात चेतन शर्मा व निरज चारोळे यांनी वेळोवेळी मदत केली.
या स्पर्धेत अतुल दिवाण, विजय धुर्वे, प्रशांत आढाव, विनोदसिंग चौहान, अर्णव हिवराले, नरेंद्र कुरलकर, ऋषिकेश इंगोले, विवेक इंगोले, प्रवीण खंडपासोले, भोजे देव, महेश मानवर, महेश मेश्राम, पंकज सरकटे, विनोद वानखडे अमरावती, प्रशांत बक्षी वाशिम, प्रफुल्ल भूपता, अतुल माइंडे, आशिष गौरशेट्टीवर, विशाल इहारे, सुरेश भूसंगे यवतमाळ, शेख युसूफ, नारायण ढोबळे, वाशिम, सदानंद देशमुख दिग्रस, श्रीकृष्ण सोडगिर घाटंजी यांनी सहभाग घेतला होता.
सायकल जनजागृतीसाठी चेतन शर्मा यांचा सिंहाचा वाटा
नागरीकांनी रोजच्या जिवनात जास्तीत जास्त सायकल वापरावी व त्यायोगे त्यांचे आरोग्य सृद्ढ राहावे यासाठी गेल्या ६ वर्षापासून चेतन शर्मा वाशीम रांदीनियर ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत. या उपक्रमामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने युवक सहभागी होत असून पर्यावरण व जीवन वाचविणार्या सायकल जनजागृतीमध्ये चेतन शर्मा यांचा सिंहाचा वाटा आहे.
Congratulations to all participants
ReplyDelete