इंटरनेटच्या काळातही ग्रंथालयचे महत्व अबाधित : प्रा. डॉ. प्रज्ञा क्षीरसागर
साप्ताहिक सागर आदित्य/
इंटरनेटच्या काळातही ग्रंथालयचे महत्व अबाधित : प्रा. डॉ. प्रज्ञा क्षीरसागर
वाशिम : स्थानिक रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात दिनांक 20/12/2021 ला ग्रंथालय उदबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वाहाणे होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ प्रज्ञा क्षीरसागर व प्रा. डॉ विजय जाधव होते. कार्यक्रमांची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. प्रा. पंढरी गोरे यांनी उदबोधन वर्गाचा उद्देश स्पष्ट केले. प्रा डॉ. संजय साळवे यांनी समाजकार्य शिक्षण व ग्रंथालयाची भूमिका स्पष्ट केली.तसेच ग्रंथालय विभाग अंतर्गत असलेल्या उपक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील विविध स्रोत व यशस्वी अभ्यास पद्धती व यश संपादनातील आवश्यकता याविषयी सांगितले. ग्रंथालयाची व्यक्तिमत्व व
अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी महत्वाची आहे.प्रा. डॉ. प्रज्ञा क्षीरसागर यांनी स्वयम व इतर माध्यम जी कौशल्य व क्षमता विकासासाठी महत्वपूर्ण ठरतात याविषयी सांगितले. अजूनही काही संदर्भ ग्रंथ विषयाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण माहितीचे संपन्न स्रोत आहेत. इंटरनेटच्या काळात आधारभूत माहितीचे स्रोत म्हणून ग्रंथालयाची महत्वाची भूमिकाआहे. प्रा. प्राचार्य किशोर वहाणे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि ग्रंथालय यांचा संबंध विषद केला. कार्यक्रमाला प्रा. वसंत राठोड, प्रा. डॉ. भारती देशमुख, प्रा. गजानन बारड, प्रा. जयश्री काळे, प्रा. गजानन हिवसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन गणेश मगर व आभार प्रदर्शन मयुरी अवताडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालय विभागाद्वारे करण्यात आले. या कार्यशाळेला स्नातक भाग 1 व भाग 2 चे विद्यार्थी हजर होते. विद्यार्थ्यांनी कार्यशालेला सक्रिय सहभाग घेतला.
0 Response to "इंटरनेटच्या काळातही ग्रंथालयचे महत्व अबाधित : प्रा. डॉ. प्रज्ञा क्षीरसागर "
Post a Comment