शिक्षण संघर्ष संघटनेचे ,तहसीलदार, मालेगाव यांना निवेदन सादर
साप्ताहिक सागर आदित्य/
शिक्षण संघर्ष संघटनेचे ,तहसीलदार, मालेगाव यांना निवेदन सादर
----------------------------------------------
23 डिसेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे महाविश्वास धरणे आंदोलन
-----------------------------------------------
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करा
मालेगाव दि.20 डिसें.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी यासाठी दि. 23 डिसेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे महाविश्वास धरणे आंदोलन सुरू होत असून या आंदोलनाबाबत माहिती देण्याकरिता वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पेन्शनग्रस्त कर्मचाऱ्यांकडून माननीय तहसीलदार रवी काळे , मालेगाव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेचे जिल्हासचिव नितेश भिंगे, मालेगाव तालुकाध्यक्ष व्हि.के.खिल्लारे, जिल्हा मार्गदर्शक प्राचार्य आर.के.घुगे, राजेश गायकवाड सर, विजय मोरे सर, देवानंद ताजणे सर ,मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे सर , माधव डोळे, एस.एन.कांबळे सर,जायभाये सर, पी.एम.कुटे सर, रामदास साबळे सर, विनोद गवळी, सुभाष गवई, भागवत पवार व इतर सर्व तालुक्यातील पेन्शनग्रस्त कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Response to "शिक्षण संघर्ष संघटनेचे ,तहसीलदार, मालेगाव यांना निवेदन सादर"
Post a Comment