-->

पशुसंवर्धन विकास कार्यक्रमांतर्गत योजनांचा    इच्छुक व्यक्ती व संस्थांनी लाभ घ्यावा

पशुसंवर्धन विकास कार्यक्रमांतर्गत योजनांचा इच्छुक व्यक्ती व संस्थांनी लाभ घ्यावा

 पशुसंवर्धन विकास कार्यक्रमांतर्गत योजनांचा


इच्छुक व्यक्ती व संस्थांनी लाभ घ्यावा


 

साप्ताहिक सागर आदित्य/

वाशिम,  (जिमाका) : केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी या नविन योजनेस मंजूरी दिली आहे. या योजनेअंतर्गत दुध प्रक्रीया (आईसक्रीम, चीज निर्मित्ती, दुध पाश्चरायजेशन, दुध पावडर इ.) मास निर्मिती व पक्रीया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती पशुपक्षी खाद्य, विश्लेशन प्रयोग शाळा या उद्योग व्यवसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी व्याज दरामध्ये 3 टक्के सुट देण्यात येणार आहे. योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना केंद्र शासनाच्या पशुपालन व डेरी विभागाच्या www.nlmudyogmitra.in या संकेतस्थळावर (नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन ) उपलब्ध आहे. पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करण्यासाठी पशुधन विकास कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन अर्ज www.nlmudyogmitra.in  या विभागाच्या संकेतस्थळावर करावे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वाशिम यांनी कळविले आहे.

0 Response to "पशुसंवर्धन विकास कार्यक्रमांतर्गत योजनांचा इच्छुक व्यक्ती व संस्थांनी लाभ घ्यावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article