राजयोग विधी : तनावमुक्तीचा मार्ग
साप्ताहिक सागर आदित्य/
राजयोग विधी : तनावमुक्तीचा मार्ग
आज अनेक आजार हे सायकोसोमाटिक अर्थात मनाच्या विकृतीमुळे तयार होतात. मनातील नकारात्मकता किंवा नकारात्मक चिंतन, व्यर्थ चिंतन इत्यादींमुळे मनात तणाव निर्माण होत असतो हा तणाव एका रात्रीत येत नाही. त्यासाठी चिंता-काळजी निर्माण करणाऱ्या अनेक घटना कारणीभूत असू शकतात. तणावाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वत:ला अंधारात ढकलण्यासारखे आहे. कारण त्यामुळे नंतर एखादी भावनिक गोष्ट देखील आपल्याला नैराश्य आणू शकते. नकारात्मक माणसे, टिव्हीवरील नकारात्मक बातम्या व नकारात्मक गोष्टी तुमची मानसिक स्थिती अधिक खराब करू शकतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूरच रहा. तसेच ताणात देखील आनंदी आणि सकारात्मक असल्याची कल्पना करा. वाईट काळात देखील आपल्याला विक्ष्वास असायला हवा की आपण यातुन पुर्णपणे नक्कीच बरे होऊ व पुन्हा आनंदी आयुष्य जगू. जसे एखाद्या काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्रीनंतर सुर्योदय हा होणारच असतो जीवनात घडलेल्या सर्व छोट्या- मोठ्या चांगल्या गोष्टीकडे स्वत: चे लक्ष्य वेधा. तुमच्या मनाला उभारी आणणाऱ्या गोष्टी शोधा. तुम्हाला आनंद वाटेल अशा छोट्या छोट्या गोष्टी करा. या गोष्टी केल्याने आनंद आणि प्रोत्साहन मिळेल. सुरुवातीला या गोष्टी करणे तुम्हाला थोडे कठीण जाईल पण हळूहळू त्यातुन तुम्हाला सहज करता येईल, सवय होईल. एकदा का तुम्हाला मेडिटेशन मध्ये आनंद अनुभवला तर तुम्ही विपरीत परिस्थितीत ही आनंदी राहु शकता हे समजु लागले की तशा अनेक गोष्टी तुम्हाला जीवनात दिसू लागतील व तुम्ही पुन्हा आनंदाचा अनुभव घेऊ लागाल. डिप्रेशन दुर करण्यासाठी सकारात्मक वायब्रेशन व मनाला उभारी आणणाऱ्या गोष्टींची मदत होते. त्यामुळे एखादे चांगले धेय साध्य करण्यासाठी वाईट गोष्टींपासून दूर राहणे हाच यावर एक उत्तम मार्ग असू शकतो. यासाठी सावध रहा, दक्ष रहा. स्वत: कडे पहा व स्वयंप्रेरीत व्हा. तुम्ही निराश होताय असे तुम्हाला वाटु लागले की तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा अथवा तशा गोष्टीचा शोध घ्या. ज्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतील स्वत: बद्दल शंका येऊ लागल्यास व उदासीन वाटु लागल्यास एखादा मनोरंक विडीओ, सुंदर फोटो अथवा निसर्गसौंदर्य पहा. पोशक आहार घ्या आहारात विविध रंगांच्या पदार्थांचा समावेश करा. कारण पोशक आहार तुम्हाला डिप्रेशन दुर करण्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्टीने सुदृढ करतो. आहार शाकाहारी त्यातून तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतील याची दक्षता घ्या. मानसिक स्वाथ्य सुधारण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची यादी करा. डिप्रेशनमध्ये निराश भावनिक अवस्थेत असे करणे थोडे कठीण जाऊ शकते. पण लक्ष विचलित करण्यासाठी व मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी या गोष्टीची तुम्हाला चांगली मदत होऊ शकते. इतर काही गोष्टी करुन तुमच्या भावनीक अवस्थेला बदला. जसे की यासाठी संगीत ऐका, बागेतून अथवा झाडाच्या सानिध्यात फिरण्यास जा ज्यामुळे तुम्हाला ताजे वाटेल. निसर्ग तुम्हाला तुमच्या मनातील भावना समजून घेण्यास उत्तेजन देईल. आधार देणाऱ्या गोष्टींना तुमच्या मनातील कृतज्ञतेच्या भावनेने जोडा. यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टीसाठी कतज्ञ आहात याचे चिंतन करा. प्रत्यक्षात पाहणे शक्य नसल्यास फोटोमध्ये सुर्योदय व सुर्यास्त पहा. कारण सोनेरी आणि केशरी रंगामुळे तुम्ही तुमच्या आत्मशक्तीसोबत पुन्हा जोडले जाल. किंवा एखाद्या बागेत जा झाडांशी मनातल्या मनात संवाद साधा खूप बरं वाटेल.
राजयोगीनी ब्रम्हकुमारी
स्नेहलता दीदी,
मालेगाव
0 Response to "राजयोग विधी : तनावमुक्तीचा मार्ग"
Post a Comment