-->

वाशिम जिल्हा पोलिस दलाचे जाहीर आवाहन

वाशिम जिल्हा पोलिस दलाचे जाहीर आवाहन


साप्ताहिक सागर आदित्य /

वाशिम:

वाशिम जिल्हा पोलिस दलाचे जाहीर आवाहन


अलीकडील त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ ठीक ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटना अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात शांतता कायम ठेवणे करिता जातीय दृष्ट्या संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलिस स्टेशन चे अधिकारी आणि बीट मार्शल हे सतत आपल्या कार्यक्षेत्रात सतर्क पेट्रोलिंग करीत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत मनुष्यबळ लाठी हेल्मेट ढाल सह पो. स्टे. ला  राखीव ठेवण्यात आले आहे.  जातीय दृष्ट्या संवेदनशील परिसरात रुट मार्च घेण्यात येत आहेत. शांतता समिती व समाज प्रतिनिधी लोकांच्या च्या सभा आयोजित करून त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सायबर सेल हे सतत सोशल माध्यमांवर लक्ष ठेवून आहे.

         

सदर गंभीर परिस्थिती चे आम्ही बारकाईने निरीक्षण करीत आहोत. सध्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात कोठेही कायदा आणि सुव्यस्थेची किंवा हिंसाचाराची  परिस्थिती नाही परंतु जर कोठेही हिंसाचाराची घटना घडत असल्यास त्याविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल. वाशिम पोलिस दलाचे वतीने आम्ही जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करीत आहे. 


                 बच्चन सिंग , IPS

           पोलिस अधीक्षक, वाशिम

0 Response to "वाशिम जिल्हा पोलिस दलाचे जाहीर आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article