रिठद येथे 'आजादी का अमृत महोत्सव' कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला, उच्च न्यायालय नागपूर येथील न्यायमूर्ती, विभागीय आयुक्त, न्यायमुर्ती जिल्ह्या सत्र न्यायालय वाशिम, मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, न्यायमुर्ती रिसोड, तहसिलदार रिसोड, गटविकास अधिकारी यांची उपस्थिती
साप्ताहिक सागर आदित्य/
रिसोड
दि. १२ नोव्हेंबर : रिठद (संत सदगुरु श्री गजानन महाराज सभागृह )येथे सकाळी ९ वाजता उच्च न्यायालय नागपूर येथील न्यायमूर्ती, विभागीय आयुक्त, न्यायमुर्ती जि सत्र न्यायालय वाशिम, मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, न्यायमुर्ती रिसोड, तहसिलदार रिसोड, गटविकास अधिकारी रिसोड विभागातील अधिकारी, पदाधिकारी यांची उपस्थितीत 'आजादी का अमृत महोत्सव' कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी रिठद येथिल नागरिक तथा रिठद व चिखली केंद्रतील सर्व माध्यमाच्या शाळांचे शिक्षक हजर होते या मध्ये सर्व विभागाचे माहिती देणारे स्टाल लावण्यात आले होते त्यामध्ये शिक्षण विभाग कडुन जि प शाळांचे माहिती देणारे स्टाल लावण्यात आले होते सदर स्टाल चे उदघाट्न मा न्यायमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले .
सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा मुख्याध्यापक यांनी आपल्या अधिनस्त सर्व शिक्षकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी लेखी स्वरूपात आदेशीत केले होते . (ज्या शाळांची NAS परीक्षा असेल अशा शाळांनी कार्यक्रमास न येता परीक्षा नियोजनानुसार पार पाडावी) अशा सूचना वरिष्ठ अधिकारी यांनी दिल्या होत्या .
स्थळ:- गजानन महाराज सभागृह
(मुर्डेश्वर मंदिरा जवळ रिठद)
वेळ:- सकाळी ९ वाजता
सर्व शिक्षक सकाळी 8.30 वाजता पांढरा शर्ट व निळा पॅट घालून, वेळेपूर्वी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर न्यायमुर्ती यांनी जिल्हा परिषद शाळा रिठद क्रमांक 2 ला भेट दिली त्यावेळी केंद्र प्रमुख हनुमानराव बोरकर गटशिक्षणाधिकारी गजाननराव बाजड गटविकास अधिकारी वंगवाडे तहसीलदार शेलार रिसोड व सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी
गटशिक्षणाधिकारी पं स रिसोड
यांनी न्यायमुर्ती सत्कार केला, न्यायमुर्ती यांनी शाळा व शालेय परिसर पाहुन समाधान व्यक्त केले.
0 Response to "रिठद येथे 'आजादी का अमृत महोत्सव' कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला, उच्च न्यायालय नागपूर येथील न्यायमूर्ती, विभागीय आयुक्त, न्यायमुर्ती जिल्ह्या सत्र न्यायालय वाशिम, मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, न्यायमुर्ती रिसोड, तहसिलदार रिसोड, गटविकास अधिकारी यांची उपस्थिती "
Post a Comment