लसीकरणासाठी ग्रामस्थांना प्रवृत्त करा - मुुख्यकार्यकारी अधिकारी सुनील निकम
लसीकरणासाठी ग्रामस्थांना प्रवृत्त करा - मुुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल निकम
मानोरा तालुक्याचा आढावा
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशिम : जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत मानोरा तालुका माघरला आहे.कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे लसीकरण करण्याची आवश्यकता नाही,असा नागरिकांचा झालेला गैरसमज अत्यंत चुकीचा आहे.संभाव्य कोरोनाची तिसरी लाट केव्हाही येऊ शकते,ही लाट केवळ कोरोना प्रतिबंधक लसच थांबवू शकते. ही बाब विचारात घेऊन ग्रामस्थांना 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त करा.असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी दिले.
आज मानोरा पंचायत समिती सभागृहात आयोजित ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या कोरोना लसीकरण आणि ग्रामपंचायत कामकाज आढावा सभेत श्री.निकम बोलत होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर,उपविभागीय अधिकारी राहुल जाधव,तहसीलदार किर्दक,गटविकास अधिकारी पांडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेशचंद्र तापे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निकम म्हणाले,रविवारी सुट्टी असली तरी लसीकरण कार्यक्रम संबंधित सर्व केंद्रावर सुरूच राहणार आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अधिकारी आणि कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्राला भेट देऊन ज्या पात्र व्यक्तींनी अद्यापही लसीचा पहिला डोस घेतला नाही, त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी पाठवावे. जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील किती अंगणवाड्यात प्रत्यक्ष नळ पाणीपुरवठा आहेत,याबाबतची माहिती तातडीने सादर करण्याबाबत ग्रामसेवकाना तसेच कोणत्या अंगणवाडीला पाण्याची सुविधा नाही त्याची माहिती सीडीपीओ यांनी सादर करण्याबाबत निकम यांनी निर्देश दिले. सभेला मानोरा तालुक्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक या सभेला उपस्थित होते.
0 Response to "लसीकरणासाठी ग्रामस्थांना प्रवृत्त करा - मुुख्यकार्यकारी अधिकारी सुनील निकम "
Post a Comment