अचानक आलेल्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतक-यांची तारांबळ : मेडशी परिसरातील चित्र
मेडशी दि १६,ऑक्टोबर : सायंकाळी ५,वाजेच्या सुमारास ,अचानक बरसलेल्या जोरदार पावसाने सोयाबीनउत्पादक शेतक-यांची तारांबळ उडाली. कांहीच्या सोयाबीन गंज्या तर कांहीचे काढणी झालेली सोयाबीन ची पोती ओलाचिंब झाल्याने शेतकरी वर्गाचे हाल झाले .
सविस्तर असे की दि.१६ ऑक्टोबर रोजी सायकाळी ५ वाजता अचानक आलेल्या जोरदार पावसाने अनेक शेतक-याच्या शेतात सुरू असलेली सोयाबीन कापणी सह काढणीची कामे विस्कळीत झालीत .काही च्या शेतातील सोयाबीन गंज्या ओल्याचिंब झाल्या तर काहींची सोयाबीन पीक काढणी सुरू असतांना सोयाबीन ची पोती ओली झाली .यावेळी सोयाबीन च्या गंज्या तथा पोती ताडपत्रीने झाकतांना शेतकरी मंडळीना तारेवरची कसरतच करावी लागली .
आधीच सोयाबीन सोंगणी च्या कामासाठी मजुर वर्ग मिळाले नसल्याने अनेक शेतक-याच्या शेतातील सोयाबीन च्या सोंगणी चे काम बाकी राहीले असतांना अचानक आलेल्या जोरदार पावसाने शेतातील मोलाचे मोठे नुकसान झाले आहे.
0 Response to "अचानक आलेल्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतक-यांची तारांबळ : मेडशी परिसरातील चित्र"
Post a Comment