मेडशी येथे नवदुर्गा विसर्जन शांततेत
प्रतिनिधी विठ्ठल भागवत,
मेडशी सह परिसरात दि,१६ऑक्टोबर : रोजी भक्तीपुर्ण वातावरणात नवदुर्गा विसर्जन करण्यात आला.यावेळी मालेगाव पोलीस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मेडशी येथे चार सार्वजनिक ठिकाणी नवदुर्गा मंडळ स्थापना करण्यात आली होती .दि १६ ऑक्टोबर रोजी भक्तीमय वातावरणात मुगळा रोड वरील तलावात नवंदुर्गा विसर्जन करण्यात आले,तर यावेळी विविध नवदुर्गा उत्सव मंडळाचे वतीने महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,जय भवानी नवदुर्गा मंडळ ,नवयुवक नवदुर्गा मंडळ,जय मुगसाजी दुर्गा मंडळ, नवदुर्गा महिला मंडळ,या मंडळानि केले शांततेत विसर्जन,
नवदुर्गा विसर्जन निमित्ताने शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मालेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रवीण धुमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुष्पलता शिरसाट , चौकी जमादार, भीमराव चव्हाण, शैलेश ठाकूर,अमोल पाटील,विजेंद्र इंगोले ,पोलीस पाटील, सौ अनिता सुधाकर चोथमल, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष शौकत पठाण, आदींनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
0 Response to "मेडशी येथे नवदुर्गा विसर्जन शांततेत"
Post a Comment