पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांची मालेगाव ब्रह्माकुमारीज विद्यालयाला सदिच्छा भेट : संचालिका स्नेहलता दीदींनी केला यथोचित सन्मान
मालेगाव/ साप्ताहिक सागर आदित्य प्रतिनिधी - प्रजापिता ब्रह्माकुमारीज् विद्यालय मालेगाव येथे पद्मश्री परम कम्प्युटर चे जनक विजय भटकर यांनी 10 ऑक्टोबर रविवारला सदिच्छा भेट दिली विजय भटकर यांचा ब्रह्मकुमारीस संस्थेशी मागील पंचवीस वर्षापासून संबंध आहे ब्रह्मकुमारीस संस्थेचा जगभर झालेला विस्तार हा विश्वकल्याणासाठी अतिशय सकारात्मक आणि आणि मनुष्य जेवणाला विश्व परिवर्तनासाठी उपयुक्त सा उपक्रम असून ब्रह्मकुमारीस विद्यालयातून दिल्या जाणारे अध्यात्मिक ज्ञान आणि ऐश्वर्य परिचय यामुळे भविष्यात दैवी गुणांची जोपासना करून सतयुग निर्मिती करणे सहज शक्य होणार आहे ब्रह्माकुमारीज् विद्यालयाच्या मुख्यालय माउंट आबू राजस्थान येथे भटकर यांनी आठ ते दहा वेळा भेट देऊन या संस्थे प्रति असणारा आपला विश्वास प्राप्त केला मालेगाव विद्यालयाच्या संचालिका राज योगिनी ब्रह्माकुमारी स्नेहलता दीदी यांनी विजय भटकर यांच्या आगमना प्रित्यर्थ त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार केला
प्रजापिता ब्रह्माकुमारीज् विद्यालय मालेगाव येथे पद्मश्री परम कम्प्युटर चे जनक डॉ विजय भटकर यांनी 10 ऑक्टोबर रविवारला सदिच्छा भेट दिली.डॉ विजय भटकर यांचा ब्रह्माकुमारीज संस्थेशी मागील पंचवीस वर्षापासून संबंध आहे.अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा या मूळगावी जाण्यासाठी जात असताना त्यांनी मालेगाव सेवा केंद्राला सदिच्छा भेट दिली.विश्वविख्यात असूनही आपल्या जन्म भूमीशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवून त्यांनी आपल्या जन्म भूमीचा नेहमीच आदर केला आहे.ब्रह्मा कुमारीज संस्थेच्या कार्याबद्दल त्यांना विशेष आनंद आणि आदर आहे.ब्रह्माकुमारीज संस्थेचा जगभर झालेला विस्तार हा विश्वकल्याणासाठी अतिशय सकारात्मक आणि आणि मनुष्य जीवनाला विश्व परिवर्तनासाठी उपयुक्त असा आदर्श उपक्रम असून ब्रह्माकुमारीज विद्यालयातून दिल्या जाणारे अध्यात्मिक ज्ञान आणि ईश्वरीय परिचय यामुळे भविष्यात दैवी गुणांची जोपासना करून सतयुग निर्मिती करणे सहज शक्य होणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. मालेगाव ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी स्नेहलता दीदी यांनी विजय भटकर यांच्या आगमना प्रित्यर्थ त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार केला.तसेच पुण्यावरून भटकर यांच्या सोबत आलेल्या बोपोडी सेवा केंद्राच्या आदरणीय ब्रह्माकुमारी सुनीता दिदी,ब्रह्माकुमारी भाग्यश्री दिदी, ब्रह्माकुमार सुनील भाई यांचाही विद्यालयाच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला.मालेगाव सेवा केंद्राच्या संचालिका स्नेहलता दिदी यांच्या सह सरिता दिदी व हर्षा दिदी यांनी केलेल्या सत्काराबद्दल डॉ विजय भटकर यांनी विशेष आभार मानले प्रसंगी विद्यालयाचे ज्ञानार्थी नंदकिशोर मुंदडा, चंद्रकांतजी गायकवाड, जुगलकिशोर काबरा, ऋषिकेश खाडे, अभिनव अहिर, अनिल सोळंकी, प्रकाश अपुतीकर, गोपाल अपुतीकर, अशोक गट्टनी, डॉ दीपक गट्टनी, प्रा. वानखेडे, कड पाटील, सीमा शेख, कासीम भाई, नितीन डाखोरे,उषाताई अहिर इत्यादी उपस्थित होते.
0 Response to "पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांची मालेगाव ब्रह्माकुमारीज विद्यालयाला सदिच्छा भेट : संचालिका स्नेहलता दीदींनी केला यथोचित सन्मान"
Post a Comment