दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि कर्नाटक साहित्य संघ, बिदर चे आयोजन
दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपुर(सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार )
कर्नाटकातील बसवकल्याण येथे 31 ऑक्टोबर रोजी "राष्ट्रीय बहुभाषिक काव्य संमेलन"
विदर्भातून कवी बबन सराडकर , क्षिप्रा मानकर (निवेदिका), कवी माधव बोबडे यांचा सहभाग
अमरावती / नागपूर २६ ऑक्टोबर : दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि कर्नाटक साहित्य संघ, बिदर यांच्या वतीने 31 ऑक्टोबर 2021 रोजी बीकेडीबी सेलिब्रेशन हॉल, बसवेश्वरा चौकाजवळ, बसवकल्याण, कर्नाटक येथे "आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत आयोजित कार्यक्रमांच्या मालिकेत 31 ऑक्टोबर 2021 रोजी "राष्ट्रीय बहुभाषिक कवी संमेलन" सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात आझादीचा अमृत महोत्सव आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारित कवितांचे सादरीकरण होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर, हुमनाबाद येथील ज्येष्ठ कवी डॉ.सोमनाथ यलवार, पदव्युत्तर व संशोधन केंद्र कन्नड केआरई महाविद्यालय बिदरचे संचालक आणि कर्नाटक साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ.जगन्नाथ हेब्बळे व दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे प्रशासन व लेखा अधिकारी दीपक पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. राष्ट्रीय बहुभाषिक काव्य संमेलनात खालील राज्यांतील नामांकित कवी मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, छत्तीसगढी आणि राजस्थानी भाषांमधील कविता वाचतील आणि गातील. या राष्ट्रीय बहुभाषिक काव्य संमेलनात ६ राज्यातील कवी सहभागी होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जेष्ठ कवी बबन सरडकर (अमरावती) व श्रीमती कविता नामदेव मोरवणकर (मुंबई) यांचे मराठी, कविवर्य माधव बोबडे (नागपूर) यांचे उर्दू, कर्नाटकचे प्रा. देवेंद्र कमल (बिदर) यांचे हिंदी, प्रा. सुधानी पाटील (रायचूर), प्रा .अंबिका बिरादार (गुलबर्गा), श्री .सचिन (बंगलोर), प्रा. हंगोजी दर्शन दत्ता (गुलबर्गा) यांचे कन्नड, डॉ. महादेवी मुळगे (बसवकल्याण) आणि श्रीमती सावित्रीबाई सुरे, मध्य प्रदेशचे श्रीमानक चव्हाण (धार) यांचे हिंदी,तेलंगणाचे श्री. कलौजी (महबूबनगर) आणि श्रीमती जुपका शुभद्रा (हैदराबाद) यांच्याकडून तेलुगू, तर छत्तीसगड चे रूपेश तिवारी (महासमुद) यांच्या कडून छत्तीसगढ़ी भाषांमध्ये कवितांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. बहुभाषामध्ये रंगणाऱ्या या काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर करणार आहे.
0 Response to "दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि कर्नाटक साहित्य संघ, बिदर चे आयोजन"
Post a Comment