12 नोव्हेबरला विद्यार्थ्यांची देशव्यापी चाचणी
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशीम : देशभरात शासकीय, निमशासकीय व खाजगी शाळांमधील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आतापर्यंतच्या अध्ययन निष्पत्तीचे मुल्यांकन करणे व शैक्षणिक प्रक्रियेत गुणात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने एन.सी.ई. आर.टी. व एस. ई. आर. टी. च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी दि. 12 नोव्हेंबर 21 रोजी देशभरातील विद्यार्थ्यांची एकाच वेळी चाचणी घेण्यात येणार असून, यासाठी दिवाळीच्या सुट्टीच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे.
वाशीम जिल्ह्यातील इयत्ता 3 री च्या 41 तुकड्यांमधील 1052 विद्यार्थी, इयत्ता 5 वी च्या 42 तुकड्यांतील 1083 विद्यार्थी, इयत्ता 8 वी च्या 71 तुकड्यांतील 1933 विद्यार्थी, तर इयत्ता 10 वी च्या 68 तुकड्यांतील 2011 विद्यार्थी असे एकूण 183 शाळांमधील 222 वर्ग तुकड्यांतील 6078 विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन हे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणाला राष्ट्रीय संपादणूक चाचणी (न्यास) असेही म्हणले जाते. मागील वर्षी कोरोनामुळे लांबलेल्या या चाचणीचे आयोजन सी.बी.एस.सी. बोर्डाच्या परिक्षा विभागाकडे देण्यात आले आहेत. ह्या सर्वेक्षणासाठी शाळा आणि त्यातील वर्ग व विद्यार्थी एन.सी.ई.आर.टी. स्वत: नमुना निवड रँडम पध्दतीने निवडणार आहेत.
ज्या शाळेत ही चाचणी होईल त्या शाळांची यादी एन.सी.ई. आर.टी. च्या वतीने चाचणीच्या केवळ 72 तास आधी जाहीर करण्यात येईल तर त्या शाळेतील ज्या तुकडीवर चाचणी घ्यावयाची आहे. ती तुकडी व त्या तुकडीतील चाचणी साठी 30 विद्यार्थी संबंधीत शाळेकरीता नियुक्त केलेले पर्यवेक्षक पथक चाचणीच्या दिवशी वेळेवर निवडतील.
0 Response to "12 नोव्हेबरला विद्यार्थ्यांची देशव्यापी चाचणी"
Post a Comment