दिवाळीपूर्वी किमान वेतन लागू करा महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत असंघटीत कर्मचार्यांची मागणी
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशीम : ग्राम पंचायत कर्मचारी यांना 10 ऑगस्ट 2020 च्या किमान वेतन वाढ अधिसुचनेनुसार 100 टक्के सुधारीत किमान वेतन राज्य शासनाकडून दिवाळीपूर्वी लागू करण्याची मागणी अप्पर सचिव ग्रामविकास विभाग, मुंबई यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, उद्योग उर्जा, कामगार विभाग मंत्रालय मुंबई यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी किमान वेतनाचे दर निश्चीत करुन अधिसुचना जाहीर केली असून, आज अखेरपर्यंत ग्राम पंचायत कर्मचारी यांना किमान वेतन वाढीचे दर राज्य शासनाकडून लागू झाले नाहीत. याबाबत राज्यातील विविध ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेकडून आपले वेळोवेळी मागणी केलेली आहे. सद्या 2013 च्या किमान वेतन वाढीनुसार ग्राम पंचायत कर्मचारी यांना पगार भेटत आहे. व ही वसुलीची अट असल्यामुळे अत्यंत अल्प प्रमाणात भेटत आहे. यामुळे ग्राम पंचायत कर्मचारी यांना कुटूंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी पार पाडत असताना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या दोन वर्षे ग्राम पंचायत कर्मचारी फुकट स्थानिक पातळीला प्रमाणीकपणे काम करीत असून सुध्दा वाढीव किमान वेतनापासून वंचीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे, आमच्या मागणीची दखल न घेतल्यास येत्या काळात आझाद मैदान मुबई येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे गणेश कोळसे, खुशाल कुटे, दिनकर वाकडे, भरत शिंदे, महादेव कडू, फकीरा टाळीकुळे यांनी म्हटले आहे आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी सहा. पोलिस अधिक्षक आझाद मैदान पोलिस स्टेशन मुंबई, आयुक्त महानगर पालिका मुंबई यांना पाठविण्यात आल्या आहेत.
0 Response to "दिवाळीपूर्वी किमान वेतन लागू करा महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत असंघटीत कर्मचार्यांची मागणी"
Post a Comment