-->

इयत्ता सहावी मराठी माध्यमाचे नवीन अभ्यासक्रम जिल्हास्तरीय प्रशिक्षकाचे प्रशिक्षण संपन्न

इयत्ता सहावी मराठी माध्यमाचे नवीन अभ्यासक्रम जिल्हास्तरीय प्रशिक्षकाचे प्रशिक्षण संपन्न

 


इयत्ता सहावी मराठी माध्यमाचे नवीन अभ्यासक्रम जिल्हास्तरीय प्रशिक्षकाचे प्रशिक्षण संपन्न


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), वाशिम आयोजित नवीन अभ्यासक्रमाचे जिल्हास्तरावर सुलभकांचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार या वर्षी इ. 2री, 3 री, 4 थी, आणि 6 वीचा नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होत आहे.त्यानुसार जिल्हास्तरीय सुलभकांचे प्रशिक्षण १ जुलै ते ४ जुलै दरम्यान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,वाशिम मार्फत प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले.

  प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन  तसेच विठ्ठल भुसारे  (प्राथमिक शिक्षणाधिकारी),  अधिव्याख्याता  डॉ राजेश गवई  (प्रशिक्षण समन्वयक),  विलास कडाळे  यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना सखोल व मार्गदर्शनपर माहिती दिली. नवीन अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, अध्यापन पद्धती, कृतीआधारित शिक्षण, मूल्यमापन प्रक्रिया तसेच प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक बाबींचे त्यांनी आणि सुलभकांनी अत्यंत सोप्या व परिणामकारक पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे समजून घेण्यास व अध्यापनात त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यास निश्चितच मदत होईल. सोबत सहसमन्व्यक  संभाजी साळसुंदर,निलेश तुळजापुरे,निलेश मिसाळ,धीरज जाधव

यांनी सुलभक म्हणून विविध विषयाबाबत प्रशिक्षण देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे तालूकास्तरीय प्रशिक्षणास दि. 06/07/2026 पासून सुरवात होत आहे.

जिल्हास्तरीय सुलभक तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यास सज्ज झाले आहेत.



0 Response to "इयत्ता सहावी मराठी माध्यमाचे नवीन अभ्यासक्रम जिल्हास्तरीय प्रशिक्षकाचे प्रशिक्षण संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article