वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे शालेय प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालयात शालेय प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
मानोरा, : वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे शालेय प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. बेलखडे मॅडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रसेन भगत हे होते.
नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे शालेय प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला."
Post a Comment