-->

कर्करोग, असंसर्गजन्य आजार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेच्या समस्या वाढत आहेत.

कर्करोग, असंसर्गजन्य आजार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेच्या समस्या वाढत आहेत.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये कर्करोग, असंसर्गजन्य आजार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेच्या समस्या वाढत आहेत. ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत प्रतिबंधात्मक व विशेष आरोग्य सेवा वेळेत पोहोचविण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यात १५ ते २२ जुलै दरम्यान आरोग्य तपासणी आणि विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत दिली. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान शिबिरावर जास्तीत जास्त भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त भंडारी, संचालक पल्लवी सापळे उपस्थित होते. तर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


#कर्करोग

#असंसर्गजन्यआजार

0 Response to "कर्करोग, असंसर्गजन्य आजार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेच्या समस्या वाढत आहेत."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article