तुकाराम तेव्हाही नको होते आणि आताही नको आहेत
साप्ताहिक सागर आदित्य
तुकाराम तेव्हाही नको होते आणि आताही नको आहेत
तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्र प्रशासनात “कडक निर्णय घेणारा अधिकारी” म्हणून ओळखले जाते. दिव्यांग विभागाचा कार्यभार मिळाल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की:
“दिव्यांग आरक्षण हा हक्क आहे, पण त्याचा गैरवापर हा गुन्हा आहे.”
याच भूमिकेतून त्यांनी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पुनर्पडताळणी सुरू केली.
या मोहिमेत 6,218 सरकारी अधिकारी/कर्मचारी यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. ही संख्या मोठी आहे, कारण इतक्या प्रमाणात संपूर्ण राज्यात एकाचवेळी पडताळणी यापूर्वी फारशी झाली नव्हती.
पडताळणीदरम्यान अनेक प्रमाणपत्रांमध्ये खालील समस्या आढळल्या:
• अपंगत्वाचे प्रमाण चुकीचे दाखवणे
• मेडिकल बोर्डचा बनावट शिक्का
• काही ठिकाणी खोटे डॉक्टर सर्टिफिकेट
• 40% पेक्षा कमी अपंगत्व असतानाही आरक्षणाचा लाभ
• UDID व प्रमाणपत्र यामध्ये विसंगती
या तपासणीत 316 जणांवर कठोर कारवाई झाली. काहींचे निलंबन झाले, काहींच्या नोकरीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि काहींवर पुढील शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू झाली.
त्याचवेळी आम्हला समजले की साहेबांची बदली आता लांब नाही कारण 21 वर्षात 25 वेळा बदली ज्या अधिकाऱ्याची होते तेव्हा समजून जायचे तों अधिकारी सरकारी सेवक आहे राजकारण्याचा गुलाम नाही नाहीतर आजही महाराष्ट्र शासनात असे कित्येक अधिकारी आहेत जे वर्षानुवर्षे एकच खात्यात काम करत आहे ना बदली होते ना त्यांच्या कडून कोणती कारवाई होते कारण राजकारण्याची लाचारी स्विकारून तुम्ही पण खा आणि आम्हला पण खायला द्या ही खेळी चालूच असतें
असो जनतेला सुद्धा प्रामाणिक अधिकारी आवडत नाही त्यांना पण भ्रष्टाचारात डुबलेले अधिकारीच आवडतात
0 Response to "तुकाराम तेव्हाही नको होते आणि आताही नको आहेत "
Post a Comment