-->

औद्योगिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नर्मदा सॉल्वेक्स प्रा. लि., काळुराम फूड प्रोडक्ट तसेच पतंजली फूड प्रोडक्ट या औद्योगिक युनिट्सना दि.७ एप्रिल रोजी भेट देऊन पाहणी केली.

औद्योगिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नर्मदा सॉल्वेक्स प्रा. लि., काळुराम फूड प्रोडक्ट तसेच पतंजली फूड प्रोडक्ट या औद्योगिक युनिट्सना दि.७ एप्रिल रोजी भेट देऊन पाहणी केली.



 साप्ताहिक सागर आदित्य 

उद्योग-प्रशासन समन्वयाला चालना; जिल्हाधिकाऱ्यांची थेट उद्योग पाहणी

गुणवत्ता-सुरक्षितता व रोजगारावर लक्ष


वाशिम,   जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नर्मदा सॉल्वेक्स प्रा. लि., काळुराम फूड प्रोडक्ट तसेच पतंजली फूड प्रोडक्ट या औद्योगिक युनिट्सना दि.७ एप्रिल रोजी भेट देऊन पाहणी केली.


भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उद्योगांतील उत्पादन प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करत विविध टप्प्यांवरील कार्यपद्धतीची माहिती घेतली. कच्चा माल साठवण, प्रक्रिया, पॅकेजिंग व वितरण या सर्व बाबींमध्ये गुणवत्ता नियंत्रणासाठी अवलंबण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. 


यावेळी कामगारांसाठी उपलब्ध सुविधा, सुरक्षितता उपाययोजना तसेच कार्यस्थळी स्वच्छता राखण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.


तसेच आयटीआय प्रशिक्षणार्थींना स्थानिक पातळीवर ऍप्रेन्टीसशिपच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयटीआय प्राचार्यांनी उद्योगांशी समन्वय साधून सक्रिय प्रयत्न करावेत, तसेच आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींना उद्योगातील प्रत्यक्ष कामकाजाची ओळख होऊन त्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांना शिफ्टनिहाय औद्योगिक युनिट्समध्ये पाहणीसाठी आणावे, असे निर्देश जिल्हाधिकारी  कुंभेजकर यांनी दिले.


उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असल्याचे नमूद करत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे,जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घूले, आयटीआयचे प्राचार्य सचिन नखाते,  आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


तिन्ही ठिकाणी तेल प्रक्रिया उद्योगातील आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा वापर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.उत्पादनातील दर्जा व सातत्याबाबत समाधान व्यक्त करत गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे निर्देश दिले.उत्पादन व्यवस्थापन, स्वच्छता व गुणवत्ता नियंत्रण प्रणालीचा आढावा घेत त्यांनी अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. यावेळी सचिन ओझा, रवींद्र येवोतकर, सी. पी. विजावर्गीय, निलेश जोशी, संजय रूहाटीया,सुरेश पटेल,मलखानसिंग राजपूत  ,नितेश एकघरे ,शहाजी सोनूने  ,रवींद्र शर्मा व विलास राजुलवार आदींची उपस्थिती होती.

0 Response to "औद्योगिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नर्मदा सॉल्वेक्स प्रा. लि., काळुराम फूड प्रोडक्ट तसेच पतंजली फूड प्रोडक्ट या औद्योगिक युनिट्सना दि.७ एप्रिल रोजी भेट देऊन पाहणी केली."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article