गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू वाटप
साप्ताहिक सागर आदित्य
सावता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आधार निवासी मतिमंद विद्यालय वाळकी ता.जि.वाशिम येथे सावता परिषद शहराध्यक्ष चेतन संतोषराव इंगोले यांच्या नेतृत्वात गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू वाटप करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फुटबॉलचे वाटप, नॅपकिन(रुमाल) वाटप व इतर वस्तू वाटप करण्यात आल्या व त्यामुळे सर्वत्र अपंग विद्यार्थी हर्षित व आनंदित झाले व त्यांच्यातर्फे सन्माननीय कल्याण काका आखाडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या उदंड आयुष्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित पांडुरंग कोठाळे सावता परिषद प्रदेश कार्याध्यक्ष, रंजनाताई परिस्कर सावता परिषद महिला जिल्हाध्यक्ष,रवि वानखेडे सावता परिषद जिल्हा उपाध्यक्ष, चेतन संतोषराव इंगोले (सावता परिषद शहराध्यक्ष वाशिम) अविनाश जितकर सावता परिषद शहर उपाध्यक्ष, संदीप वानखेडे उपशहराध्यक्ष, अभिषेक चोपडे उपशहराध्यक्ष, महेश सारसकर,आदित्य काळे,गणेश इंगोले, गणेश जीतकर, व इतर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
0 Response to " गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू वाटप "
Post a Comment