-->

मंगरूळपीर तालुक्यात चिया पिकावरील विशेष प्रशिक्षण उत्साहात    शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मंगरूळपीर तालुक्यात चिया पिकावरील विशेष प्रशिक्षण उत्साहात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग



साप्ताहिक सागर आदित्य 

 मंगरूळपीर तालुक्यात चिया पिकावरील विशेष प्रशिक्षण उत्साहात 

 शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


वाशिम,  मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चिया पिकाचे विशेष प्रशिक्षण कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण सभागृह, वाशिम येथे आयोजित करण्यात आले.


अनिसा महाबळे, प्रकल्प संचालक आत्मा, यांनी चिया पिकाची यशोगाथा, चिया बियाण्यांची पौष्टिकता, त्यापासून तयार होणारे पौष्टिक पदार्थ, तसेच आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी महाविस्तार एआय ऍप बाबतही माहिती देऊन शेतकऱ्यांना डिजिटल शेतीचा उपयोग सांगितला. कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी चिया सरबताचा आस्वाद घेतला.


आरिफ शहा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम, यांनी चिया पिकाचा इतिहास, लागवड तंत्रज्ञान, काढणी पश्चात प्रक्रिया, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तसेच सेंद्रिय निविष्ठा निर्मिती याबाबत सविस्तर माहिती दिली.


या प्रशिक्षणामध्ये सुमारे ३०० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. चिया लागवडीचे क्षेत्र वाढत असल्याने शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड करून एकरी उत्पादन व उत्पन्न वाढवावे, यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरले.


कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग व आत्मा वाशिम यांच्या सहकार्याने करण्यात आले. शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाबद्दल उत्साह व्यक्त केला.

0 Response to "मंगरूळपीर तालुक्यात चिया पिकावरील विशेष प्रशिक्षण उत्साहात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article