-->

निवडणूक कामकाजासाठी यंत्रणांनी सज्ज असावे          जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर   नोडल अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक

निवडणूक कामकाजासाठी यंत्रणांनी सज्ज असावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर नोडल अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक

 


साप्ताहिक सागर आदित्य 

निवडणूक कामकाजासाठी यंत्रणांनी सज्ज असावे 

       जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 

नोडल अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक 


वाशिम,   

निवडणूक ही एक व्यापक प्रशासकीय प्रक्रिया असून प्रत्येक घटकाची सुसूत्र अंमलबजावणी अत्यावश्यक आहे. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी वेळेच्या चौकटीत समन्वय साधून नियोजन पूर्ण करावे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.


नगर परिषद/ नगरपंचायत तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी आज नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूकपूर्व सर्व तयारींचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.


याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे,नगरपालिका प्रशासन सहआयुक्त बी.डी. बिक्कड यांची प्रमुख उपस्थिती होती.


या बैठकीत मनुष्यबळ व्यवस्थापन व रॅन्डमायजेशन, मतपत्रिका आणि पोस्टल बॅलेट छपाई, मतमोजणी प्रशिक्षण, तसेच एसएसटी (Static Surveillance Team) एफएसटी (Flying Squad Team) आणि व्हीएसटी (Video Surveillance Team) यांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर निवडणूक साहित्याचे नियोजन, साठवण, वाहतूक आणि वितरण व्यवस्था, मतदान जनजागृती या बाबींवर विशेष भर देण्यात आला.


जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर म्हणाले,निवडणुकीत मनुष्यबळ व्यवस्थापन, साहित्य वितरण व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, ईव्हीएम व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. प्रत्येक विभागाने नेमून दिलेली जबाबदारी वेळेत , अचूक आणि समन्वयाने पूर्ण करावी असे सांगितले.


निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन सर्वतोपरी सज्ज असावे असेही निर्देश दिले. बैठकीत उपस्थित नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित कार्याची प्रगती सादर केली.

0 Response to "निवडणूक कामकाजासाठी यंत्रणांनी सज्ज असावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर नोडल अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article