वाशिम जिल्ह्यात नामनिर्देशनांचा वाढता ओघ; नगराध्यक्ष पदासाठी २१ तर सदस्य पदासाठी २८० अर्ज
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्यात नामनिर्देशनांचा वाढता ओघ; नगराध्यक्ष पदासाठी २१ तर सदस्य पदासाठी २८० अर्ज
वाशिम,
वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर या चार नगरपरिषद व मालेगाव या एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्यास उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दि. १५ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १० तर सदस्य पदासाठी तब्बल २०१ अशा २११ नामनिर्देशन अर्जांची नोंद निवडणूक विभागाकडे झाली.
यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत एकूण नगराध्यक्ष पदासाठी २१ आणि सदस्य पदासाठी २८० असे एकूण ३०१ नामनिर्देशन अर्ज जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडत असून उमेदवारांकडून मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.
१५ नोव्हेंबरला प्राप्त नामनिर्देशनांचा तपशील :
वाशिम नगरपरिषद
नगराध्यक्ष पदासाठी : ३
सदस्य पदासाठी : ५४
एकूण अर्ज : ५७
कारंजा नगरपरिषद
नगराध्यक्ष : १
सदस्य : ४७
एकूण अर्ज : ४८
मंगरूळपीर नगरपरिषद
नगराध्यक्ष : २
सदस्य : ३४
एकूण अर्ज : ३६
रिसोड नगरपरिषद
नगराध्यक्ष : २
सदस्य : ४९
एकूण अर्ज : ५१
मालेगाव नगरपंचायत
नगराध्यक्ष : २
सदस्य : १७
एकूण अर्ज : १९
१५ नोव्हेंबरपर्यंत दाखल झालेल्या एकूण नामनिर्देशनांची आकडेवारी :
वाशिम नगरपरिषद
नगराध्यक्ष : ९
सदस्य : ८५
एकूण : ९४
कारंजा नगरपरिषद
नगराध्यक्ष : १
सदस्य : ५१
एकूण : ५२
रिसोड नगरपरिषद
नगराध्यक्ष : ७
सदस्य : ७४
एकूण : ८१
मंगरूळपीर नगरपरिषद
नगराध्यक्ष : २
सदस्य : ४९
एकूण : ५१
मालेगाव नगरपंचायत
नगराध्यक्ष : २
सदस्य : २१
एकूण : २३ नामनिर्देशन प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यातील पाचही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने उमेदवार-समर्थकांची गर्दी वाढताना दिसत आहे. जिल्हा निवडणूक विभागाने आवश्यक सुविधा व सुरक्षेच्या उपाययोजना करून नामनिर्देशन प्रक्रिया सुरळीत ठेवली आहे.
*रविवार १६ नोव्हेंबरला नामनिर्देशन दाखल करता येणार*
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजीही पार पडणार आहे. यादिवशी उमेदवारांकडून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे.
0 Response to "वाशिम जिल्ह्यात नामनिर्देशनांचा वाढता ओघ; नगराध्यक्ष पदासाठी २१ तर सदस्य पदासाठी २८० अर्ज"
Post a Comment