-->

माझे मत माझे भविष्य’ चित्रकला पोस्टर स्पर्धेतून एनसीसी विद्यार्थ्यांची प्रभावी मतदान जनजागृती

माझे मत माझे भविष्य’ चित्रकला पोस्टर स्पर्धेतून एनसीसी विद्यार्थ्यांची प्रभावी मतदान जनजागृती



साप्ताहिक सागर आदित्य 

‘माझे मत माझे भविष्य’ चित्रकला पोस्टर स्पर्धेतून एनसीसी विद्यार्थ्यांची प्रभावी मतदान जनजागृती


वाशिम , नगर परिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आणि स्वीप  उपक्रमाचा एक भाग म्हणून, वाशिम शहरात मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘माझे मत माझे भविष्य’ या विषयावर विशेष चित्रकला पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नगर परिषद निवडणूक विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना  यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आकर्षक, परिणामकारक आणि सामाजिक संदेश देणारी पोस्टर्स साकारली.


श्री बाकलीवाल विद्यालयात आयोजित या स्पर्धेस निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पळसकर, निलेश गायकवाड, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी व शिक्षणाधिकारी संजय ससाने, नगर परिषद स्वीप नोडल अधिकारी राहुल मारकड, सहाय्यक नोडल अधिकारी दिक्षिता राठोड, काजल राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व, सुजाण नागरिकत्व आणि लोकशाहीची ताकद यांचा प्रभावी संदेश देणारी चित्रे व घोषवाक्ये मांडली.


स्पर्धेतील विजेते


प्रथम क्रमांक : रजत कुटे

द्वितीय क्रमांक : सेजल सरनाईक

तृतीय क्रमांक : अनुष्का मोरे


 सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि आकर्षक बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.


या उपक्रमाचे कौतुक बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल सर, एनसीसी अधिकारी तसेच सर्व शिक्षकांनी केले.


या सामूहिक प्रयत्नातून चला, मतदानाचा टक्का वाढवूया आणि सशक्त लोकशाही घडवूया ! हा प्रभावी संदेश वाशिमकरांपर्यंत पोहोचला.

0 Response to "माझे मत माझे भविष्य’ चित्रकला पोस्टर स्पर्धेतून एनसीसी विद्यार्थ्यांची प्रभावी मतदान जनजागृती"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article