-->

 तीन नवीन रुग्णवाहिका आरोग्य सेवेत दाखल

तीन नवीन रुग्णवाहिका आरोग्य सेवेत दाखल



साप्ताहिक सागर आदित्य 

 तीन नवीन रुग्णवाहिका आरोग्य सेवेत दाखल


वाशिम,  जिल्हा परिषद वाशिम यांच्या वतीने प्रा.आ.केंद्र काटा, जऊळका व रिठद या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


या कार्यक्रमाचे लोकार्पण जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस. ठोंबरे हे प्रमुख उपस्थित होते.


नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. या रुग्णवाहिकेच्या चाव्या ताब्यात देताना संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व वाहन चालक उपस्थित होते.


या उपक्रमामुळे आपत्कालीन सेवांची गुणवत्ता वाढून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

0 Response to " तीन नवीन रुग्णवाहिका आरोग्य सेवेत दाखल"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article