स्वच्छता जनजागृती बाबत अभियानाचा शुभारंभ.
साप्ताहिक सागर
स्वच्छता जनजागृती बाबत अभियानाचा शुभारंभ.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यभर "हमारा शौचालय- हमारा भविष्य" हे अभियान राबविण्यात येत असून त्याचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटीलआणि राम श्रृंगारे यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली, यादरम्यान या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे 10 डिसेंबर पर्यंत हे अभियान राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. सर्व गावातील वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाची देखभाल दुरुस्ती करणे आणि त्याचा नियमित वापर करून गावामध्ये स्वच्छता राखली जावी याविषयी या अभियानात भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील यांनी दिली .
0 Response to "स्वच्छता जनजागृती बाबत अभियानाचा शुभारंभ."
Post a Comment