-->

जागतिक शौचालय दिनानिमित्त 'हमारा शौचालय- हमारा भविष्य' ही विशेष मोहिम

जागतिक शौचालय दिनानिमित्त 'हमारा शौचालय- हमारा भविष्य' ही विशेष मोहिम



साप्ताहिक सागर आदित्य 

जागतिक शौचालय दिनानिमित्त 'हमारा शौचालय- हमारा भविष्य' ही विशेष मोहिम


केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त (दि. १९ नोव्हेंबर) पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने  “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.  या उपक्रमात   जिल्यातील सर्व गावात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये  दुरुस्ती  व रंगरंगोटी करून वापरात आणण्यात येणार आहे . मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे 10 डिसेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणाऱ्या  या  उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती या मोहिमेत सहभाग नोंदविणार आहेत. यामाध्यमातुन राबविण्यात येणार्‍या उपक्रमात आरोग्य, शिक्षण, महिला व बाल कल्याण तसेच उमेद या विभागांनी सहभागी होण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक धैर्यशिल पाटील यांच्या नेतृत्वात ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शौचालये ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालयांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

------

या कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण तसेच हवामान अनुकूल स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. 

------

21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत गावागावांत मोहिमेचे विविध उपक्रम राबविण्यात येतील. उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक

शौचालये व सामुदायिक शौचालये यांचा अंतिम टप्प्यात विशेष गौरव करण्यात येणार आहे. 10 डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून उत्कृष्ट शौचालय पुरस्कार जाहीर केले जातील. तरी या मोहिमेत सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी केले आहे.

0 Response to "जागतिक शौचालय दिनानिमित्त 'हमारा शौचालय- हमारा भविष्य' ही विशेष मोहिम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article