-->

परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत आयोजनासाठी सज्ज असावे            जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत आयोजनासाठी सज्ज असावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर



साप्ताहिक सागर आदित्य 

परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत आयोजनासाठी सज्ज असावे   

       जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


महाटीईटी परीक्षा २०२५ तयारीचा जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न


  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार असून या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परीक्षा आयोजन सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली.


या बैठकीत परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत आयोजनासाठी करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धूपे, योजना शिक्षणाधिकारी श्रीकांत भूसारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव,पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी व उपशिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती यनगुलवार तसेच डायट प्राचार्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


वाशिम जिल्ह्यात पहिल्या पेपरसाठी ३,६६९ आणि दुसऱ्या पेपरसाठी ४,६०१ परीक्षार्थी बसणार आहेत. परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून —

पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १.००, तर दुसरा पेपर दुपारी २.३० ते सायं. ५.०० या वेळेत घेण्यात येईल.


पहिल्या पेपरसाठी १५ परीक्षा केंद्रे आणि दुसऱ्या पेपरसाठी २२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, फेस रिडिंग व मेटल डिटेक्शन सुविधा उपलब्ध असून, परीक्षार्थ्यांनी केंद्रावर किमान दीड तास आधी उपस्थित राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.


प्रत्येक झोनसाठी १ झोनल ऑफिसर, १ व्हिडिओग्राफर आणि १ बंदुकधारी पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व केंद्रसंचालक, सहाय्यक परिरक्षक आणि झोनल अधिकारी यांच्या नियुक्त्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी केल्या आहेत.


परीक्षेचे संपूर्ण सनियंत्रण प्राथमिक शिक्षणाधिकारी (जि.प. वाशिम) जिल्हा नियंत्रक म्हणून, तर माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा सहनियंत्रक म्हणून पाहणार आहेत. परीक्षेपूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सर्व अधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर सभा आयोजित केली जाणार आहे.


परीक्षा साहित्याचे वितरण सर्व केंद्रसंचालकांना करण्यात येणार असून जिल्हा नियंत्रण कक्षाने सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती बैठकीत देण्यात  आली. या आढावा बैठकीस जिल्हा सनियंत्रण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

0 Response to "परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत आयोजनासाठी सज्ज असावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article