
पंचायत समिती सभापती पदाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर
साप्ताहिक सागर आदित्य
पंचायत समिती सभापती पदाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर
वाशिम, दि. ९ ऑक्टोबर महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-व असाधारण क्रमांक ३१७ दिनांक ९ सप्टेंबर २०२५ नुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ अन्वये महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने क्रमांक/जिपनि २०२५/प्र.क्र.१२ज/पंरा-२, दि. ९ सप्टेंबर, २०२५ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-व असाधारण क्रमांक ३१७ दिनांक ९ सप्टेंबर २०२५ मधील ग्राम विकास विभागाची अधिसूचना क्रमांक/जिपनि-२०२५/प्र.क्र.१२ज/पंरा-२, दिनांक ९ सप्टेंबर, २०२५ नुसार वाशिम जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील सहा पंचायत समित्यांचे सभापती पदाचे आरक्षण अडीच वर्षांच्या कालावधीकरिता खालील प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यातील ६ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला राखीव १, नागरिकांचा मागास प्रवर्ग १, महिला राखीव १, सर्व साधारण २, महिला राखीव १ आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत गुरूवार, दि.९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता, नियोजन भवन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे विशेष सभा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी उपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव उपस्थित होते.
पंचायत समिती सभापती आरक्षण संदर्भात आरक्षणाचा पहिला प्रकार अनुसूचित जाती (महिला) या पदाचे आरक्षण यामध्ये सर्वात पुर्वी अनुसूचित जाती आरक्षण निघालेली पंचायत समिती मानोरा आहे. २००३ ते २००६ त्यामुळे सदर अनुसूचित जाती महिला आरक्षण निश्चित झाले.
पंचायत समिती सभापती आरक्षण संदर्भात आरक्षणाचा दुसरा प्रकार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या पदाचे आरक्षण ग्रामविकास विभाग यांची अधिसूचना असाधारण क्रमांक ३१७ मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ अन्वये निश्चित करून देण्यात आलेल्या आरक्षणापैकी नामाप्र (सर्वसाधारण) १ जागा, नामाप्र (महिला) १ जागा, यापूर्वी पंचायत समिती वाशिम, मानोरा, मालेगाव यामध्ये नामाप्र आरक्षण असून त्यापैकी मानोरा (अ.जा महिला) निश्चित झालेली आहे. त्याआधी २०१६ ते २०१८ मध्ये रिसोड व कारंजा नामाप्र साठी राखीव होते. त्यापैकी अजून मागे कारंजा नामाप्र आरक्षण २००८ - २०११ मध्ये होते. रिसोड नामाप्र आरक्षण २००६-२००८ मध्ये होते. म्हणून कारंजा व रिसोड पैकी रिसोड मध्ये नामाप्र आरक्षण निश्चित होते. दुसरे नामाप्र आरक्षण मंगरूळपीर मध्ये निश्चित झाले.
नामाप्र आरक्षण मंगरूळपीर व रिसोड यामध्ये यापूर्वीचे नामाप्र महिला आरक्षण विचारात घेतले असता मंगरूळपीर नामाप्र महिला २००८ ते २०११ आणि रिसोड नामाप्र महिला २००६ ते २००८ अशी आहे.त्यामुळे रिसोड नामाप्र महिला आरक्षण निश्चित होते. मंगरूळपीर नामाप्र सर्वसाधारण निश्चित झाले.
प्रवर्ग सर्वसाधारण एकुण ३ जागा त्यापैकी सर्वसाधारण महिला १, सर्वसाधारण २ उर्वरित पंचायत समिती वाशिम, मालेगाव, कारंजा यापैकी मालेगाव सर्वसाधारण महिला आरक्षण २०२२ ते २०२५ , कारंजा सर्वसाधारण महिला आरक्षण २०२० ते २०२२ आणि वाशिम सर्वसाधारण महिला आरक्षण २००६ ते २००८ असे आहे.त्यामुळे सर्वसाधारण महिला आरक्षण वाशिम पंचायत समिती सर्वसाधारण (महिला), मालेगाव सर्वसाधारण आणि कारंजा सर्वसाधारण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीला नागरिक, पत्रकार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "पंचायत समिती सभापती पदाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर "
Post a Comment